सोलापूर प्रतिनिधी/समाधान रोकडे : उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे व आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्ननाने कोरोना रुग्णासाठी 50 बेडची सुरुवात होणार असून यामध्ये 10 बेड ऑक्सिजन चे असणार आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यातील बी बी दारफळ,रानमसले,वडाळा,कळमन व कौठाळी या गावातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बालाजी पवार व वडाळा गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे यांच्या कल्पनेतून या बेडची सुरुवात होणार आहे.
आज आमदार यशवंत माने व बळीराम काका साठे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली.पाहणी केल्यानंतर आमदार यशवंत माने यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे काम करणारे अधिकारी,डॉक्टर,नर्स व कर्मचारी यांच्यासोबत चर्चा करून आपण लवकरात लवकर या ठिकाणी 50 बेडची सुरूवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच सर्वांनी या साठी सहकार्य करण्याचे आव्हान देखील केले.यावेळी येथे उपस्थित उत्तर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप,नितीन बंडगर, उत्तर पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र शिलवंत,सरपंच पांडुरंग लंबे,उपसरपंच सुनील पाटील,सदस्य भैय्या,मार्डी गावचे उद्योगपती प्रल्हाद काशीद, तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी,डॉ.संतोष बारसुळे,डॉ.स्नेगधा भोसले,दीपाली गवई,आरोग्य सहायक घतरगी सी. एस तसेच नर्स व कर्मचारी उपस्थित होते.