• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर महापालिकेत ‘कमळ’ फुलवण्यासाठी पालकमंत्र्यांचा ‘हा’ फंडा..!

by Yes News Marathi
December 15, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूर महापालिकेत ‘कमळ’ फुलवण्यासाठी पालकमंत्र्यांचा ‘हा’ फंडा..!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यभरातील 29 महापालिका साठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सोलापूर महापालिकेत येऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे,जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख आमदार, विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शिवाय 154 कोटी रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन केले. आजवर तीनही आमदार पालकमंत्र्यांसमवेत क्वचितच दिसून आले. मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख या दुखावलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना गोंजरण्याचे काम सुरू केले. सकाळी विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात त्यांनी विविध कामांचे उद्घाटन केले विजयकुमार देशमुख यांचे भरभरून कौतुक केले. दुपारी महापालिकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुभाष देशमुख यांचे देखील कौतुक केले. देवेंद्र कोठे यांचेही त्यांनी भरभरून कौतुक केले. भाजपचे तीनही आमदार ताकतवान आहेत. बाहेरच्या नेत्यांची गरज नाही. महायुती करून निवडणूक लढवायची की स्वबळावर याबाबत तीनही आमदार तसेच शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेतच त्यांनी आपकी बार सोलापूर महापालिकेत 75 पार असा नारा दिला. 102 जागांसाठी 1200 वर अर्ज भाजपकडे आले आहेत त्यामुळे हे तीनही आमदार मिळून कोणाला तिकीट द्यायचे ते ठरवतील असे त्यांनी सांगून टाकले. त्यामुळे आता तिकीट कोणाला मिळणार यासाठी इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या आणि मूळ भाजपमध्ये असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना चांगलेच टेन्शन आले आहे. एकूणच आज पालकमंत्र्यांनी तीनही आमदारांना महापालिका निवडणूक स्वबळावर जिंकायची असाच संदेश देण्यासाठी त्यांचे कौतुक सुरू केले.

Previous Post

नाभिक वधु-वर पालक परिचय मेळाव्याच्या अध्यक्षपदी राजु शुक्लवार यांची निवड

Next Post

पुणे, पिंपरी – चिंचवड प्रमाणे भाजप सोलापुरातही देणार राष्ट्रवादीला झटका..!

Next Post
पुणे, पिंपरी – चिंचवड प्रमाणे भाजप सोलापुरातही देणार राष्ट्रवादीला झटका..!

पुणे, पिंपरी - चिंचवड प्रमाणे भाजप सोलापुरातही देणार राष्ट्रवादीला झटका..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In