निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह राज्यांमधील एस आय आर अर्थात विशेष सखोल पुर्नरिक्षण प्रक्रियेदरम्यान यादीतून वगळल्या गेलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी पुन्हा संधी दिली आहे . यामध्ये अनुपस्थितीत, स्थलांतरित मृत आणि दुबार नोंदणी अशी नोंदणी झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या मतदारांचा समावेश आहे .आयोगाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना अशा मतदारांच्या याद्या पुन्हा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत . यासाठी बुथस्तरीय अधिकारी तसेच ECI प्रणाली द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच स्थलांतरित आणि बेघर मतदारांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय संबंधित मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपातील नावांची यादी अपलोड केली जाईल. या ठिकाणी नागरिक आपले नाव तपासू शकतात त्यात नावापुढेच वगळण्यामागील संभाव्य कारण ही दिले आहे .जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी अशा लोकांचे इम्युनरेशन फॉर्म ई सी आय नेट डॅशबोर्डवर पुन्हा जारी करतील. अंशतः भरलेले मतदार नोंदणी अर्ज ईसीआयनेट वरील निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांच्या डॅशबोर्ड वर उपलब्ध करून दिले जातील.
बुथस्तरीय अधिकारी हे राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या बूथ स्तरीय प्रतिनिधींच्या समन्वयाने घरोघरी भेट देतील ,तसेच मतदारांशी थेट फोन द्वारे संपर्क साधतील आणि मतदारांना अर्ज भरण्यास मार्गदर्शन करतील.











