• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
November 7, 2026
in Blog
0
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्ह्यात १४ हजार ८५२ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त; ३२ लाख ५६ हजार रुपयांचा माल ताब्यात

सोलापूर : दिवाळीच्या सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने सोलापूर जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविली आहे. या मोहिमेंतर्गत २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील २५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, विविध अन्नपदार्थांचे ६९ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. तसेच कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून एकूण १४ हजार ८५२.६ किलो अन्नपदार्थांचा, अंदाजे ३२ लाख ५६ हजार ४०९ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेत तेल, मिठाई, खवा, क्रीम, पनीर, पेढा, नमकीन पदार्थ आणि मसाले आदी अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी उत्कर्षा एखंडे यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ व रेणुका पाटील यांच्यासमवेत ६ नोव्हेंबर रोजी अक्कलकोट येथील मे. रांगोळी स्वीट मार्ट या पेढीची तपासणी केली. यावेळी पेढा व स्वीट हलवा या पदार्थांचे दोन नमुने घेण्यात आले. तसेच ८२९ किलो, २ लाख ५० हजार २० रुपये किमतीचा साठा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला.

४ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गणेश कदम यांनी सांगोला येथील मे. श्रीराज ॲग्रो टेक या आस्थापनाची तपासणी केली. यावेळी तेलाचे तीन नमुने घेण्यात आले असून, ३ हजार १४६.८ किलो, ६ लाख २९ हजार ३६० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

तसेच २८ ऑक्टोबर रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मे. एस. जी. ट्रेडर्स, गावडेवाडी, कंदलगाव येथे तेलाचे तीन नमुने घेण्यात आले. यावेळी ६ हजार २३५.४ किलो, १० लाख ६० हजार ५९९ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. याच दिवशी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मे. गणेश रामचंद्र आपटे प्रा. लि., अंत्रोळी येथे क्रीम व पनीर या पदार्थांचे चार नमुने घेऊन २ हजार २१६ किलो, ७ लाख १३ हजार ७०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या काळात विशेष दक्षता

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे अथवा उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, वापरण्यात येणारे तेल, रंग तसेच इतर घटकांची गुणवत्ता यांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन, मुंबईचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे आणि सोलापूरचे सहायक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ, रेणुका पाटील, मंगेश लवटे, गणेश कदम, कीर्ती देशमुख व उत्कर्षा एखंडे यांनी पूर्ण केली.

जिल्ह्यातील अन्न आस्थापनांची तपासणी यापुढेही सुरू राहणार आहे. अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमांचे काटेकोर पालन करावे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांनी केले आहे.

Previous Post

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

Related Posts

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!
Blog

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

November 7, 2026
मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!
Blog

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

November 6, 2026
आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर
Blog

आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर

November 5, 2026
जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
Blog

जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

November 3, 2026
सोलापुरातील ऊस दर आंदोलन चिघळणार?
Blog

सोलापुरातील ऊस दर आंदोलन चिघळणार?

November 1, 2026
ए आय डेटा सेंटर सारख्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल
Blog

ए आय डेटा सेंटर सारख्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल

October 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 7, 2026
शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

November 7, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १० अत्याधुनिक ‘फायर रिस्पॉन्स बाईक्स’ दाखल; महापौर विनायक कोंड्याल व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १० अत्याधुनिक ‘फायर रिस्पॉन्स बाईक्स’ दाखल; महापौर विनायक कोंड्याल व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

November 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026