सोलापुरात नावाजलेले आरटीओ अधिकारी राजेंद्र मदने यांनी मदने फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेला दोन बसेस मोफत दिल्या आहेत. या बस मधून नीलम नगर ते कन्ना चौक या भागातील नागरिकांना दररोज मोफत प्रवास करता येणार आहे. या बसची देखभाल दुरुस्ती, डिझेल,मेंटेनन्स, तसेच चालकांचा सर्व खर्च फाउंडेशन उचलणार आहे. सोलापूर महापालिकेला कोणताही बोजा न पाडता कायमस्वरूपी या बसेस मदने फाउंडेशनच्या माध्यमातून चालविल्या जाणार असून त्यातून प्रवाशांना मोफत प्रवास दिला जाणार असल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यानिमित्ताने राजेंद्र मदने यांनी सोलापूरकरांची नाळ कायम ठेवली आहे हे विशेष.











