सोलापूर : सोलापूर शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा, या सामाजिक उद्देशाने आप्पाजी धुरकोजी मदने फाउंडेशनच्या सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या मोफत सार्वजनिक बससेवेचा लोकार्पण सोहळा आज शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात उत्साहात पार पडला.







या मोफत सार्वजनिक बससेवेचे उद्घाटन सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कुलगुरू प्रकाश महानवार,उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, अप्पाजी मदने फाउंडेशनचे महादेव आप्पाजी मदने,उत्तम आप्पाजी मदने,बाळासाहेब मदने अनिल कानडे, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे यांच्यासह नगरसेवक अक्षय अंजीखाने, नगरसेवक बिजू प्रधाने, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक व्यंकटेश कोंडी, नगरसेवक युवराज सर्वदे, नगरसेवक रवी कयावले, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक बसवराज केंगणालकर, नगरसेवक सात्विक बडवे, नगरसेविका कलावती गदगे, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका सारिका चाबुकस्वार आदी उपस्थित करण्यात आले.
तसेच महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या प्रमुख सारिका आकुलवार आणि अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे यांचीही उपस्थिती होती.
आप्पाजी धुरकोजी मदने फाउंडेशनच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेली ही मोफत बससेवा नीलमनगर ते कन्ना चौक या मार्गावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बससेवेमुळे या मार्गावरील नागरिकांना विनामूल्य प्रवासाची सुविधा मिळणार असून, विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.
सामाजिक बांधिलकीतून नागरिकांना दिलासा
आजच्या धावपळीच्या जीवनात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहराच्या विकासातील महत्त्वाची बाब आहे. नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आप्पाजी धुरकोजी मदने फाउंडेशनने पुढाकार घेत सुरू केलेली ही मोफत बससेवा निश्चितच कौतुकास्पद आहे. सामाजिक संस्थांनी CSR उपक्रमांच्या माध्यमातून शहराच्या विकासात सहभागी होणे ही सकारात्मक बाब असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
महापौर विनायक कोंड्याल यांनी या उपक्रमाचे स्वागत करून, सोलापूर शहरातील नागरिकांना विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले. सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नागरिकांच्या हिताचे असे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक सुविधेला सामाजिक सहकार्याची जोड मिळाली असून, नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली ही मोफत बससेवा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.











