सोलापूर : २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या दर्शनी भागात उभारण्यात आलेल्या संविधान उद्देशिकेला सभागृह नेते शिवानंद पाटील,विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे,महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी,गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व कोन्सिल हॉल परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जनसंपर्क अधिकारी विनोद कुलकर्णी, जयप्रकाश अमनगी,शेखर सकट,प्रा.राजकुमार निकंबे,बाबूराव संगेपाल,अनिल कंदलगी ,सागर मुनाळे आदी मान्यवर उपस्थित होते.