विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालावरून सत्ताधारी पक्ष असलेल्या राज्यातील भाजप महायुती सरकारला ओव्हर कॉन्फिडन्स नडला असे दिसून येते. वरवरचा प्रचार… अंतर्गत नाराजी, मनमानी निर्णय, याचा फटका भाजपला बसला. मुख्यमंत्र्यांचे होम ग्राउंड नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पुणे पदवीधर मतदार संघात भाजपला पराभव पत्करावा लागला याचे आता चिंतन होणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे,सातारा, कोल्हापूर,सांगली,सोलापूर या पाच जिल्ह्यात भाजपचे चार मंत्री आणि 24 आमदार आहेत. असे असताना देखील शरद पवारांनी आपली ताकद दाखवून विभागीय आयुक्त राहिलेल्या प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख जाधव यांच्या रूपाने भाजपला धूळ चारली. त्यामुळे या मतदारसंघात भाजपने ऐनवेळी उमेदवारी दिलेल्या स्मिता जाधव यांचा पराभव झाला. तर नागपूर पदवीधर मतदार संघात सौ सोनार की एक लोहार की या वाक्या प्रमाणे काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले.
पुणे पदवीधर आणि मराठवाडा राष्ट्रवादीकडे, नागपूर पदवीधर काँग्रेसकडे, अशा तीन जागी महाविकास आघाडीला यश मिळाले.अमरावती शिक्षक मतदार संघ शिंदे सेनेकडे आणि पुणे शिक्षक मतदार संघ भाजपाकडे अशा पद्धतीने दोन जागा महायुतीला मिळाल्या. तरुणांचे आंदोलन, विविध परीक्षांमधील घोटाळे, बेरोजगारांचे प्रश्न दुष्काळी परिस्थिती आणि मनमानी निर्णय याचा फटका महायुतीला बसला आहे यातून आता ग्राउंड रियालिटी पाहूनमहायुतीच्या नेत्यांना जमिनीवर उतरावे लागेल हे नक्की.











