सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त कार्यालयात आयुक्त पि.शिवशंकर यांच्यासमवेत महापालिका अधिकाऱ्यांनी संविधान प्रास्तविकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
सोलापूर–26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.त्यानुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त कार्यलयातआयुक्त पी.शिवशंकर यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी उपआयुक्त धनराज पांडे, उपआयुक्त एन.के पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार,सहाय्यक आयुक्त सौ.पुष्पांजली भगत,सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील,साहाय्यक नगर रचना संचालक सुगडे,कार्यालय अधीक्षक युवराज गाडेकर,जनसंपर्क अधिकारी विनोद कुलकर्णी,आयुक्त यांचे पीए राहुल कुलकर्णी,गिरीष पुकाळे,हेमंत रसाने,पंडित वडतीले,सुलभा कासनिस तसेच आयुक्त कार्यलयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तसेच यावेळी महापालिकेच्या सर्व कार्यालयात खातेप्रामुख्याच्या समेवत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आले.