• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासकीय कार्यालये, स्माशनभूमी झाले चकाचक; अडीच हजार श्री सदस्यांनी केली स्वच्छता

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2026
in मुख्य बातमी
0
शासकीय कार्यालये, स्माशनभूमी झाले चकाचक; अडीच हजार श्री सदस्यांनी केली स्वच्छता
0
SHARES
0
VIEWS

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रम

सोलापूर : रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालये व स्मशानभूमीमध्ये सुमारे अडीच हजार श्री सदस्यांनी एकाचवेळी सकाळी सात ते दहा या वेळेत स्वच्छता मोहिम घेतली. यामुळे शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये व स्माशनभूमीचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसून आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने १ मार्च २०२६ रोजी सोलापूरात ही मोहिम घेण्यात आली. पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छता अभियान घेण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गतच सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सर्व समाजाच्या स्मशानभूमी आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आली. यामध्ये सोलापूर शहर व परिसरातील जवळपास २५ ठिकाणी स्वच्छता मोहीम श्री सदस्यांकडून करण्यात आली. या अभियानात प्रतिष्ठानच्या वतीने एकूण ६३ वाहनांतून कचरा गोळा करुन त्याची महापालिका प्रशासनाच्या साहयाने विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी ३५ ट्रॉली, १२ छोटा हत्ती, ४ टेम्पो, ७ डंपर, ३ अॅपेच्या माध्यमातून कचरा संकलीत करण्यात आला.

यावेळी शहर व शहर परिसरातील समर्थ बैठकीतील सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यासाठी सदस्यांनीच झाडू फावडे, टिकाव, टोपली आदी साहित्य आणले होते. हॅन्डगोल्ज व मास्क परिधान करुन यावेळी सदस्यांनी सर्वत्र स्वच्छता केली. शासकीय कार्यालयात गेल्या कित्येक वर्षापासून अडगळीत असलेला मोठा कचरा यावेळी सदस्यांनी कशाचीही तमा न बाळगता केवळ काही तासात गोळा केला. त्यामुळे सोलापूरकरांतून या अभियानाचे सर्वत्र कौतुक होत होते.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वीही सोलापूर शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवलेले आहेत. याशिवाय शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याचे उत्तम संगोपन देखील केलेले आहे.

जिल्ह्यामध्ये जलपुनर्भरणाचा उपक्रमही या प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला आहे. कुंभारी येथील रे नगर येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने २ वर्षापासून वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम सुरू आहे. यामध्ये जवळपास ३ हजार विविध वृक्षांचे लागवड व संगोपन चालू आहे.

ना आरडाओरडा, ना भोसकाभोसकी
स्वयंशिस्त सदस्यांनी केला शांततेत कार्यक्रम

स्वच्छता अभियान म्हणलं की अनेकदा कामापेक्षा गाजावाजाच जास्त होत असल्याचे दिसुन येते. रविवारी शहरात राबविण्यात आलेल्या अत्यंत व्यापक स्वरुपाच्या स्च्छता अभियानात मात्र कोठेही गाजावाजा दिसून आला नाही. ना आरडाओरडी, ना भोसकीभोसकी ना फोटोसेशन अशा अवस्थेत सदस्यांनी यावेळी अत्यंत शांततेत स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वी केला.

Previous Post

तिरूमला तिरुपती देवस्थान संचालिका टी.जानकीदेवी यांना पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सवम समितीच्या वतीने निवेदन

Next Post

प्रात्यक्षिका द्वारे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

Related Posts

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
Next Post
प्रात्यक्षिका द्वारे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

प्रात्यक्षिका द्वारे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026