आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक… मार्गारेट अल्वा की जगदीप धनखड?

0
13

नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. निवडणुकीचे निकालही आजच सायंकाळपर्यंत जाहीर होतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार माजी राज्यपाल जगदीप धनखड आहेत. त्याचवेळी विरोधकांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. यावेळी निवडणुकीबाबत काय समीकरणं बनवली जातात, कोणाचं पारडं जड, जाणून घ्या उपराष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित गोष्टी…

संसद भवनात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. नवे उपराष्ट्रपती 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतील.