सोलापूर महापालिकेतील नालेसफाई घोटाळ्याबाबत आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख तसेच आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केल्याबद्दल भाजप नगरसेवक अनंत जाधव यांनी आमदारांचे आभार व्यक्त केले. अधिवेशनात ठोस कारवाईबाबत निर्णय न झाल्यास अधिवेशन संपल्यानंतर सोलापूर महापालिकेत कामकाज करण्यासाठी हतबल झालेल्या आयुक्त सचिन ओंबासे यांना पदावरून हटवण्याबाबत तसेच नालेसफाई घोटाळ्यामध्ये अडकलेल्या तत्कालीन नगर अभियंता सारिका अकुलवार यांना बडतर्फ करण्याबाबत मी भूमिका घेणार असल्याची माहिती अनंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना देखील मी कल्पना देणार असल्याचे ते म्हणाले. शहरातील एक ते आठ झोनमधील नालेसफाई तसेच आदीला नदीचे खोलीकरण करण्याचे काम रंजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांना दिले होते. एवढे करोडो रुपयाचे काम दिले असताना त्यांच्याकडून साधी बँक गॅरंटी देखील घेतली नाही. 98 लाख रुपये देण्याऐवजी रणजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्स ला एक कोटी एकवीस लाख रुपये दिले असल्याचे प्रशासनाने लेखी उत्तरात कबूल केली आहे. त्यांची सुमारे तीन कोटी नऊ लाखांची बिले आहेत. अजून यामध्ये खूप घबाड असून आयुक्त रणजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे एवढे लाडका करतात हे समजत नसल्याचे जाधव म्हणाले. नगर अभियंता हे पद खूप प्रभावी असून अख्खी महापालिका तेच चालवतात त्यामुळे अकुलवार यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस केले जात नाही उलट त्यांना दोन दोन महत्त्वाची पदे दिली आहेत. पुन्हा अकुलवार यांना नगरा अभियंता पद दिले तर मी नगरसेवक पदाचा राजीनामा देईन असे देखील जाधव म्हणाले.










