सोलापूर : भारतीय संविधान दिनानिमित्त आज सोलापूर महानगरपालिका व समाज कल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल व जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या वेळी उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे तसेच सोलापूर महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

















