• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
September 8, 2026
in Blog
0
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न
0
SHARES
5
VIEWS

सर्व शासकीय यंत्रणांनी केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

सोलापूर, दि. ८ (जिमाका) : केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना मार्गदर्शक सूचना दिल्या.नियोजन भवन येथील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार ज्योती वाघमारे, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.रोजगारनिर्मितीला प्राधान्य द्यावेमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात जास्तीत जास्त कामे सेल्फवर ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून द्यावा. मंजूर असलेली पाणंद रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत तसेच अद्याप सुरू न झालेली कामेही विलंब न करता मार्गी लावावीत.धोकादायक अंगणवाडी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यकतेनुसार नवीन जागेचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत. स्वच्छ भारत मिशन, शहराचा पाणीपुरवठा, नवीन अंगणवाड्यांचे प्रस्ताव, अंगणवाड्यांमध्ये शुद्ध पाणी व स्वच्छतागृहांची सुविधा, बालकांची नियमित आरोग्य तपासणी तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी निर्देशित केले. योजनांची अंमलबजावणी वेळेत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशबैठकीत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी विविध केंद्रीय योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत संबंधित विभागांना योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे आणि निर्धारित कालावधीत करण्याच्या सूचना दिल्या.

योजनांमधील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा. केंद्र शासनाच्या योजनांच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही या दृष्टीने सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी निर्देशित केले.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार असून, पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांनी रोजगार हमी योजना, महिला बचत गट, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, सोलापूर शहर भुयारी गटार योजना, पायाभूत सुविधा, आरोग्य योजना तसेच विविध योजनांअंतर्गत प्रलंबित असलेली कामे तसेच कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत माहिती जाणून घेऊन प्रशासनाने हे सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत अशी मागणी केली.प्रारंभी केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या विविध शासकीय विभागांनी त्यांच्या विभागांतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती आणि सद्यस्थिती बैठकीत सादर केली. मागील दिशा समितीच्या बैठकीचे इतिवृत्त वाचून त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, अमृत अभियान, सोलापूर शहर पाणीपुरवठा व भूयारी गटार योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, समग्र शिक्षा, एकात्मिक बाल विकास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, डिजिटल इंडिया, सांसद आदर्श ग्राम योजना यांसह विविध केंद्रीय योजनांचा आढावा घेण्यात आला.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी बैठकीच्या विषयांची माहिती दिली.

Previous Post

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

Next Post

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

Related Posts

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!
Blog

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…
Blog

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

September 8, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा
Blog

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Blog

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत
Blog

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026
Next Post
गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास ...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026