सोलापूर : येथील ए. जी. पाटिल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार महाविद्यालयात “दशभुजा रुपी न्यायशक्ती – जागर नारीशक्तीचा: ‘ती’ चे विधी कवच” या विशेष अभियानांतर्गत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांचे स्वागत, दीपप्रज्वलन करून झाली। प्राध्यापिका एल्. एस्. बिराजदार यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक मांडले.
या कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक म्हणून अमोलकुमार अ. देशपांडे (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर),रामचंद्र वाघमारे (संस्थापक सचिव, सारथी फाउंडेशन, सोलापूर),डॉ. एम्. ए. चौगुले (प्राचार्य, ए. जी. पी. पी. आय., सोलापूर),एस्. के. मोहिते (उपप्राचार्य, ए. जी. पी. पी. आय., सोलापूर) आदीउपस्थित होते
मान्यवरांनी खालील विषयांवर प्रकाश टाकला :
अंमली पदार्थांचे दुष्परिणाम: सारथी फाउंडेशनचे संस्थापक सचिव श्री. रामचंद्र वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना नशा आणि अंमली पदार्थांच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच संबंधित कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली एक कीड आहे. व्यसनाधीनतेला अनेक तरुण विद्यार्थी बळी पडत आहेत. व्यसनाधीनतेमुळे आयुष्य नकारार्थी विचारांना कसे थांबवावे व सकारार्थी दृष्टिकोन जोपासण्यास कसे मदत करावे याविषयी सखोल मार्गदर्शन उदाहरणांच्या माध्यमातून करण्यात आले.
पोक्सो व रॅगिंग प्रतिबंधक कायदा: मुख्य वक्ते न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी युवक-युवतींना बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणारा ‘पोक्सो कायदा’ आणि शैक्षणिक संस्थांमधील ‘रॅगिंग प्रतिबंधक कायदा’ यांवर मार्गदर्शन केले.
स्वसंरक्षण प्रात्यक्षिके: प्रचिती जोगदंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके (Self-defense demonstration) सादर केली.
समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला। शेवटी प्राध्यापिका एल्. एस्. बिराजदार यांनी उपस्थितांचे व आयोजकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, संस्थेचे सचिव शिवानंद सिद्धेश्वर पाटील तसेच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले व उपप्राचार्य एस. के. मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.











