• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 21, 2026
in Blog
0
रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा
0
SHARES
0
VIEWS

टेंभुर्णी: शिक्षकांचे प्रश्न समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि ते मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे, हीच प्रभावी नेतृत्वाची खरी ओळख असते. याच कार्यपद्धतीचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीतून आला आहे. पदोन्नतीनंतर तब्बल आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या पुढाकाराने मार्गी लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून डॉ. रोंगे सरांच्या कार्याची जिल्ह्यात चर्चा होत आहे.

आमदार होण्यापूर्वीच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी डॉ.बी.पी. रोंगे सरांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विशेषतः रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमधील पदाधिकारी व शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी दाखविलेली तत्परता, प्रशासकीय प्रक्रियेचा अभ्यास आणि पाठपुराव्याची भूमिका यामुळे शिक्षकवर्गाचे लक्ष त्यांच्या कार्याकडे वेधले गेले आहे. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य तसेच खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे गेल्या वर्षापासून पुणे विभागातील शिक्षकांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सक्रिय आहेत. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना भेटी देत तेथील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य व संस्थाचालकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांकडे केवळ आश्वासनांच्या दृष्टिकोनातून न पाहता, संबंधित प्रकरणाचा अभ्यास, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, योग्य प्रशासकीय मार्गाचा अवलंब आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या माध्यमांतून प्रश्न सोडविण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष चर्चेत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून डॉ. रोंगे सरांकडे पाहिले जात आहे. दरम्यान, शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या या उपक्रमात डॉ. रोंगे सरांच्या पत्नी, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त प्रेमलता रोंगे यादेखील सक्रिय सहभाग घेत आहेत. विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन त्या डॉ. रोंगे सरांच्या कार्यपद्धतीची, शिक्षकांच्या प्रश्नांबाबतच्या भूमिकेची आणि त्यांच्या प्रयत्नांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. याच अनुषंगाने नुकत्याच माढा तालुक्यातील मोडनिंब व परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांना प्रेमलता रोंगे यांनी भेटी दिल्या. यामध्ये मारुतीराव हरीराव महाडिक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मोडनिंब, संजीवनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोडनिंब, वसुंधरा इंग्लिश मीडियम स्कूल मोडनिंब, उमा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोडनिंब, संगनबसवेश्वर शिवयोगी कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, मोडनिंब, नंदीकेश्वर हायस्कूल उपळाई, महाराणी ताराराणी कन्या प्रशाला उपळाई, मदर पब्लिक स्कूल माढा, महात्मा फुले विद्यालय वरवडे, न्यू इंग्लिश स्कूल आढेगाव आणि न्यू इंग्लिश स्कूल टाकळी या शाळा-महाविद्यालयांचा समावेश होता. या भेटीदरम्यान त्यांनी संबंधित संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिकांसोबत संवाद साधला. डॉ. रोंगे सरांची काम करण्याची पद्धत, प्रत्येक प्रश्नाचा अभ्यासपूर्ण विचार, प्रशासकीय प्रक्रियेची जाण, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रश्न मार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. यावेळी महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य के. बी. होडगर यांनी डॉ. रोंगे सरांच्या कार्याविषयी विश्वास व्यक्त करताना सांगितले, ‘डॉ. बी.पी.रोंगे सरांच्या कार्यपद्धतीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असून त्यांच्या पुढाकारामुळे आमचे प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.’ शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, शैक्षणिक क्षेत्रातील घटकांशी थेट संवाद साधणे आणि प्रशासकीय पातळीवर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे, या बाबींमुळे डॉ. बी. पी. रोंगे सरांचे नाव सध्या शिक्षकवर्गात चर्चेत आहे. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत सुरू असलेल्या भेटीगाठी आणि शिक्षकांशी साधला जाणारा संवाद यामुळे त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढताना दिसत आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, प्रश्न सोडविण्याची कृतीशील भूमिका आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या मुद्द्यांमुळे डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याकडे शिक्षकांचे लक्ष वेधले जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकवर्गातील या संवादाला महत्त्व प्राप्त झाले असून, शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस काम करणाऱ्या नेतृत्वाबाबतची अपेक्षा अधिक ठळक होत आहे.

Previous Post

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार

Next Post

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

Related Posts

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
Blog

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
Blog

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले काशीपीठाचे जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचे आशीर्वाद
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले काशीपीठाचे जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचे आशीर्वाद

October 20, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजीत गांधी यांची भेट
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजीत गांधी यांची भेट

October 20, 2026
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!
Blog

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश
Blog

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
Next Post
दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार - सुधाकर इंगळे महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

October 21, 2026
दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

October 21, 2026
रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026