• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

Yes News Marathi by Yes News Marathi
September 12, 2026
in इतर घडामोडी
0
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : प्रभाग क्रमांक २३ मधील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी मा. उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह प्रभागातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.सेंट थॉमस शाळा, नागू-नारायणवाडी, अक्षत फार्म, मशाळ वस्ती, पंचमुखी चौक तसेच प्रभागातील विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, उद्यान, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन यासंदर्भातील समस्या जाणून घेण्यात आल्या.

नागरिकांच्या तक्रारी केवळ तात्पुरत्या स्वरूपात न सोडवता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश उपमहापौरांनी दिले.नागरिकांच्या समस्या निदर्शनास येताच उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभागात प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पाणीपुरवठा, नगर अभियंता, उद्यान, रस्ते, ड्रेनेज, विद्युत, घनकचरा व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी पाहणीसाठी उपस्थित होते.

सध्या गणेशोत्सव व विविध उत्सवांचा माहोल असल्याने प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश उपमहापौरांनी संबंधित विभागांना दिले. तसेच प्रलंबित कामांचा सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीने प्रशासनाने कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या.या पाहणीदरम्यान उद्यान व मंडई सभापती राजशेखर पाटील, विधी व न्याय समिती सभापती सत्यजित वाघमोडे, पश्चिम मंडल अध्यक्ष महेश देवकर, श्रीनिवास बुरुडकर, विभागीय कार्यालय क्रमांक ६ चे अधिकारी पानगल, विद्युत विभागाचे इंगळे, कनिष्ठ अभियंता शेफाली, कनिष्ठ अभियंता वाघ, कनिष्ठ अभियंता पूजा चव्हाण, कनिष्ठ अभियंता देवकर, विद्युत विभागाच्या पूजा देशमाने, आरोग्य निरीक्षक ढुढे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

“नागरिकांच्या तक्रारींचे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन निराकरण करून प्रभागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर आपला भर आहे. उत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने समन्वयाने व तत्परतेने काम करावे,” असे उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous Post

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

Next Post

धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश

धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026
धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश

धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026