कर्तव्य हीच पुजा अशी शिकवण देणाऱ्या जगदज्योति महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या दैदिप्यमान कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी जुळे सोलापूर भागात महात्मा बसवेश्वर भवन व्हायला पाहिजे अशी लिंगायत समाजाची अनेक वर्षांपासून मागणी आहे.

सदर मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या बसव ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा समन्वयक मान.आमदार यशवंत माने यांना महात्मा बसवेश्वर भवन निर्माणसाठी निवेदन देण्यात आले. त्यावेळी सदरच्या मागणीबाबत आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय घेऊ असे उत्तर बसव ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

यावेळी बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे, सचिव राहुल जत्ती,प्रमुख कार्यवाह शिवराज विभूते, कार्याध्यक्ष बसवराज चाकाई, दक्षिण तालुका अध्यक्ष जतीन निमगाव, शहर उपाध्यक्ष सिद्धांत रंगापुरे, सुधाकर कोरे, अजिंक्य उप्पीन, दत्ता केरे, विकास हिरेमठ तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्यने उपस्थित होते.