येस न्युज मराठी नेटवर्क : आमदार यशवंत माने यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतुन (२०२१- २०२२) उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शनिवार राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व आ.यशवंत माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी सोलापूर बाजार समिती चे संचालक जितेंद्र बाबा साठे,राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद,युवक तालुका अध्यक्ष बालाजी साठे,उपसभापती जितेंद्र शीलवंत,ग्रामपंचायत सदस्य मनोहर साठे,हरीभाऊ घाडगे,डॉ घोरपडे सह सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.