येस न्युज मराठी नेटवर्क : शासनाने आदेश दिल्यामुळे उद्यापासून सोलापूर शहरातील निर्बंध बऱ्यापैकी प्रमाणात कमी होणार आहेत. सिनेमा ग्रह नाट्यगृह मल्टिप्लेक्स आणि धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत मात्र दुकाने आणि हॉटेल्स उद्यापासून सकाळी सात ते रात्री दहा या वेळेस सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. स्वातंत्र्याचा उद्या अमृत महोत्सव असल्यामुळे व्यापाऱ्यांना जरी स्वातंत्र्य मिळाले असले तरीही दुकानात तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे दोन डोस पूर्ण झाले पाहिजेत अशी अट घातल्यामुळे व्यापारी वर्गात टेन्शन कायम आहे. एकीकडे लसीचा तुटवडा ..दुसरीकडे आर्टिफिशिआर चाचण्यांचे रिपोर्ट चार दिवसानी मिळतात .. असे असताना सोलापूर महापालिकेने फक्त व्यापारी आणि हॉटेल वर्गाला टार्गेट करून दंडाच्या पावत्या करू नयेत. 18 वर्षावरील तरुणांचे लसीकरण मे महिन्याच्या अखेरीपासून सुरू झाले त्यांचे 84 दिवसानंतर चा दुसरा डोस पूर्ण होण्याचा कालावधी अद्याप शिल्लक असताना शासन असे आदेश कसे काढू शकते ? त्यामुळे 18 ते 45 वयोगटातील असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा नियम अडचणीचा ठरत आहे. उद्यापासून सोलापूर शहरातील हॉटेल्स दुकाने शॉपिंग मॉल जिम सलून, योगा, स्पोर्ट्स तसेच पूर्ण क्षमतेने शासकीय कार्यालय सुरू राहणार आहेत त्यामुळे व्यापारी वर्गातील लसीकरण मोहीम व्यापारी वर्गासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे