सोलापूर : शहर व जिल्ह्याच्या covid-19 चा सोमवार दिनांक 16 ऑगस्ट चा अहवाल प्राप्त झाला आहे. शहर व जिल्हा मिळून नवीन 558 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरामध्ये दोन आणि जिल्ह्यामध्ये 556 व्यक्तीना नव्याने कोरोना झाला आहे.
जिल्ह्यातील 540 तर शहरातील दहा व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. जिल्ह्यातील सहा व शहरातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. तालुकानिहाय आढावा घेतला असता माढा तालुक्यात सर्वाधिक 138, पंढरपूर तालुक्यात 107, माळशिरस तालुक्यात 98, सांगोला तालुक्यात 90 नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. म्युकरमायकोसिसचा आज जिल्ह्यात नवीन एक रुग्ण आढळला आहे.