सोलापूर : सदर बाजार पोलिस स्टेशनच्या डिबी पथकाने सोमवारी सकाळी एका कारमधून नेण्यात येत असलेला १५ पोती गुटखा जप्त केला आहे .
याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर 70 फूट रोड वरून जाणाऱ्या कारला थांबवण्यात आले. तपासणी केली असता या कारमध्ये गुटख्याची 15 होती सर्व गुटखा जप्त करून अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदर बझार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी डीबी पथकातील कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.