सोलापूर : सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचालित सह्याद्री बालक मंदिर, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सोलापूर या शाळेत आज 15 ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांचे हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आवताडे बी.बी.,प्रशालेचे मुख्यध्यापक उमाकांत पाटील, माऊली अवताडे, संतोष चव्हाण, तानाजी घोलप, मुख्याध्यापक शालिनी नाईकनवरे, अंबुळे, चटके, जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका अनिता धोत्रिकर व सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. चटके, शिवाजी सुरवसे, पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.