• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल बनल्या कोरोना रूग्णांसाठी मसीहा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 30, 2021
in मुख्य बातमी
0
काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल बनल्या कोरोना रूग्णांसाठी मसीहा
0
SHARES
1
VIEWS

प्रभागातील नागरिकांसाठी सुरु केले ऑक्सिजनयुक्त कंटेनर कोविड सेंटर

सोलापूर – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे.रुग्णांना उपचार मिळणे अवघड बनले आहे.शिवाय बेड आणि ऑक्सिजन अभावी अनेकांचे बळी जात आहेत.गोरगरिबांना उपचारासाठी अक्षरशः वणवण भटकंती करावी लागत आहे.सोलापूरात रुग्णांची अवस्था बघून प्रभाग क्रमांक १६ च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल प्रभागातील गरजू रुग्णांसाठी धावून आल्या आहेत.प्रभाग कोरोनामुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी गुरूनानक चौक परिसरातील ऑफिसर्स क्लबसमोर असलेल्या संस्मरण उद्यानाच्या बाहेरील मोकळ्या जागेत रस्त्याच्या कडेला चक्क कंटेनर कोविड सेंटर उभारले आहे.हे कंटेनर साधेसुधे नसून संपूर्ण वातानुकूलित असून याठिकाणी २४ तास डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे.आठ बेडचे ऑक्सिजनयुक्त हे कंटेनर कोविड सेंटर सोमवारपासून 

कार्यान्वित होणार असल्याची माहिती नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिली.

   नगरसेवक फंडातून सुमारे १५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या कंटेनर कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना ऑक्सीजन बरोबरच औषधगोळ्यासुद्धा मोफत देण्यात येणार आहेत.कोरोनाच्या कालावधीत ऑक्सिजन बेड न मिळाल्याने कोणाचा जीव जाणार नाही या उद्देशाने हे वातानुकूलित कंटेनर कोविड सेंटर उभारण्यात आल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.अमरदीप कंस्ट्रक्शनचे सलीम शेख यांनी अत्यंत कमी कालावधीत या कंटेनर हॉस्पिटलची निर्मिती केली आहे.

    प्रभाग क्रमांक १६ हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे .दाटीवाटीने असलेली घरे आणि अन्य कारणांमुळे नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्यामुळे आणि त्यावेळी  त्यांना अन्य मोठ्या रुग्णालयात उपचाराअभावी त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून तातडीने त्या नागरिकाला उपचार मिळावेत म्हणून     ऑक्सिजनयुक्त कंटेनर कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.

    – लोकप्रतिनिधींचे एक पाऊल पुढे – 

महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी शुक्रवारी दुपारी या वातानुकूलित कंटेनर कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.नगरसेविका फिरदोस पटेल यांनी राबविलेली ही संकल्पना अत्यंत चांगली आहे.प्रत्येक प्रभागात असे कंटेनर कोविड सेंटर उभारले तर मोठ्या हॉस्पिटलवरील ताण कमी होण्यास निश्चित मदत होईल असे त्यांनी सांगितले.कोरोनाची महामारी कमी करायची असेल तर सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागात असे सेंटर उभारून रुग्णांच्या मदतीला धावून आले पाहिजे असे ते म्हणाले.महापालिका आपल्यापरीने कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतच आहे.असे असतानाच लोकप्रतिनिधींनी सुद्धा आता आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून कोरोना रुग्णांसाठी एक पाऊल पुढे टाकल्यामुळे बऱ्याच गोष्टींवरचा ताण कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.

 – कोरोनामुक्त प्रभागासाठी उचलले पाऊल  – 

सोलापूर शहरात कोरोना रुग्ण आणि त्याचबरोबर मृतांचा वाढता आकडा चिंताजनक बनला आहे. ऑक्सीजनबेड शिल्लक नसल्यामुळे अनेक जण दगावत आहेत तर बहुतांश हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्यामुळे कोरोना झालेल्या रुग्णांना उपचार मिळणे अवघड बनले आहे. अशावेळी लोकप्रतिनिधी या नात्याने प्रभागातील नागरिकांच्या मदतीला धावून येणे आपण आपले कर्तव्य समजतो .आणि याच कर्तव्य भावनेतून प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी तसेच संपूर्ण प्रभाग कोरोनामुक्त करण्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपये खर्चून वातानुकूलित कंटेनर कोविडड सेंटर उभारण्यात आले आहे. याशिवाय स्वखर्चातून डॉक्टर मंडळींची सुद्धा मदत घेण्यात आली आहे तसेच मोफत औषधगोळ्यासुद्धा रुग्णांना देण्यात येणार आहेत. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांना या ठिकाणी ऑक्सिजन बेडच्या माध्यमातून उपचार करूनच त्याला घरी पाठविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.

ऑक्सीजन बेडसह गरम पाण्यासाठी गिझर – 

प्रभाग क्रमांक १६ च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सुरू केलेल्या दोन वातानुकूलित कंटेनर कोविड सेंटरमध्ये एकूण आठ बेड आहेत. ज्यामध्ये चार बेड ऑक्सीजनयुक्त तर ४ बेड अन्य रुग्णांवर उपचारासाठी ठेवण्यात आले आहेत. एका कंटेनरमध्ये ओपीडीसह चार बेड तर दुसऱ्या कंटेनरमध्ये ऑक्सीजन बेड तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी येणारे एम.डी.मेडिसिन डॉक्टर तसेच नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वातानुकूलित रूम तयार करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णांना संडास आणि बाथरूमची व्यवस्था असून गरम पाण्यासाठी गिझरचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. मुबलक पाण्याची व्यवस्था सुद्धा टाक्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दोन्ही कंटेनरमध्ये २४ तास चालेल अशी वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच पंखेसुद्धा बसविण्यात आले आहेत. स्वच्छ प्रकाश यावा म्हणून एलईडी लाइट्स लावण्यात आले आहेत. तर ऑक्सिजनचे सिलेंडर ठेवण्यासाठी कंटेनरच्या बाहेर सुरक्षित अशा प्रकारचा बॉक्स तयार करण्यात आला आहे.कंटेनरच्या बाहेरील संपूर्ण परिसर स्वच्छ राहण्यासाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी बाकडे टाकून विविध प्रकारच्या झाडांनी परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.

Previous Post

सिद्धेश्वर तलावाभोवतीचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद घेणार ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषद घेणार ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा

सोलापूर जिल्हा परिषद घेणार ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026