येस न्युज मराठी नेटवर्क : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले. राज्यसभेच्या 12 खासदारांवर निलंबनाची ही कारवाई करण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही कारवाई मागील अधिवेशन सत्र काळातील आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. विरोधकांच्या या आक्रमकतेवर राज्यसभेने कारवाई केली आहे. राज्यसभेने दिलेल्या नोटिसीनुसार, राज्यसभा सदस्यांनी केलेल्या वर्तवणुकीची सभागृहाने गंभीर दखल घेतली आहे. राज्यसभेच्या सभापतींची अवहेलना, सभागृहाच्या नियमांचा सतत गैरवापर करून गैरवर्तन करणे, हिंसक कृतींद्नारे सभागृहाच्या कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा केलेल्या प्रयत्नांचा निषेध करण्यात येत आहे, असे म्हटले. राज्यसभेत 11 ऑगस्ट रोजी मोठा गदारोळ झाला होता.
या सदस्यांवर झाली कारवाई
इलामाराम करीम (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), फुलो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), , रिपुन बोरा (काँग्रेस), , बिनॉय विश्वम (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), राजमणी पटेल (काँग्रेस), , डोला सेन (काँग्रेस), , शांता छेत्री (काँग्रेस), , सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस) , प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना) आणि अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)