मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागातील अनियमिततांविरोधात कठोर भूमिका घेत मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. विभागातील पाच अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले असून, आणखी २१ अधिकाऱ्यांची विभागीय स्तरावर चौकशी करण्यात येणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी या निलंबनाचे आदेश जारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
निलंबित अधिकाऱ्यांची नावे काय?
मालेगाव येथील सुपारी जप्ती व विल्हेवाट प्रकरणातील पाच निलंबित अधिकाऱ्यांची नावे यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पुढीलप्रमाणे आहेत.
- अविनाश दाभाडे – अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तचर विभाग, नाशिक.
- अमित रास्कर – अन्न सुरक्षा अधिकारी.
- गोपाळ कासार – अन्न सुरक्षा अधिकारी.
- योगेश देशमुख – अन्न सुरक्षा अधिकारी.
- सुवर्णा महाजन – अन्न सुरक्षा अधिकारी.










