• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रस्त्यांसाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तत्काळ होकार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 12, 2026
in मुख्य बातमी
0
रस्त्यांसाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तत्काळ होकार
0
SHARES
1
VIEWS

राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक : पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती

सोलापूर : शहराच्या विकास आराखड्यातील तसेच अक्कलकोट रस्ता, होटगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ होकार दिला. जिल्हा वार्षिक नियोजन बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानावरून मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. परंतु सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून वाढीव निधी देण्यात यावा. त्याचप्रमाणे अक्कलकोट रस्ता आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांकरिता लागणारा निधी ७५ टक्के राज्य शासन आणि २५ टक्के उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय उद्योजकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयात बदल करून ७५ टक्के राज्य शासन आणि २५ टक्के जिल्हा नियोजन समिती किंवा महापालिकेकडून घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागणीला तत्काळ मंजुरी देत या मागणीप्रमाणेच निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले.

अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील उद्योजकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन औद्योगिक वसाहतींमधील समस्या सोडविण्याची मागणी केली होती. याप्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचा शब्द उद्योजकांना दिला होता. महानगरपालिका निवडणुकांच्यावेळीही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट रस्ता आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांसह इतर सुधारणांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. आचारसंहिता संपताच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून हा विषय मार्गी लावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याच्या मागणीला होकार दिल्यामुळे शहरातील तसेच एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या कामाला आता वेग येणार आहे.

या बैठकीस आमदार देवेंद्र कोठे, प्रभारी जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे तसेच शहर आणि जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर शहरात आयटी पार्क येण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते विकासासाठी वाढीव निधी देण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळालेला होकार शहर विकासासाठी फलदायी ठरणार आहे
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

उद्योजकांना मोठा दिलासाअक्कलकोट रस्ता तसेच होटगी रस्ता औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांकरिता उद्योजकांकडून २५ टक्के रक्कम घेण्याचा निर्णय झाल्यामुळे उद्योजकांमध्ये अस्वस्थता होती. सोलापूरच्या उद्योग जगताला पुन्हा पूर्वीप्रमाणे ‘अच्छे दिन’ येण्यासाठी २५ टक्के रक्कम उद्योजकांनी भरण्याच्या नियमात बदल करावा, अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी हा प्रश्न शासन दरबारी मांडत उद्योजकांवरचा भार हलका करत मुख्यमंत्र्यांकडून अतिरिक्त निधीकरिता होकार मिळवल्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Previous Post

दुर्दैव सोलापूरकरांचे- दमाणीनगरच्या रेल्वे ब्रीजचे काम थांबले , खासदार -आमदार गप्प..!

Next Post

सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब गावाजवळ हॉटेल ओंकार पॅलेस जवळ भरधाव क्रेटा कार लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी, क्रेटा कार चालकाचा जागीच मृत्यू

Related Posts

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
Next Post
सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब गावाजवळ हॉटेल ओंकार पॅलेस जवळ भरधाव क्रेटा कार लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी, क्रेटा कार चालकाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब गावाजवळ हॉटेल ओंकार पॅलेस जवळ भरधाव क्रेटा कार लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी, क्रेटा कार चालकाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026