• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशभक्तिपूर्ण घोषणा देत सोलापुरात निघाली भारत जिंदाबाद रॅली…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2025
in इतर घडामोडी
0
देशभक्तिपूर्ण घोषणा देत सोलापुरात निघाली भारत जिंदाबाद रॅली…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय सैन्याने अद्वितीय शौर्य दाखवत पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले तसेच त्यांच्या ड्रोन हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या धाडसी सैनिकी मोहिमेचे कौतुक करण्यासाठी आणि अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिक व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात “भारत जिंदाबाद रॅली” चे आयोजन करण्यात आले.

ही रॅली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री मा. ना. रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आली होती. सोलापूर शहर व जिल्हा स्तरावर ही रॅली पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.

रॅलीची सुरुवात पक्ष कार्यालय येथून झाली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. “भारत माता की जय”, “भारतीय सैन्याचा विजय असो”, अशा देशभक्तिपूर्ण घोषणा देत रॅलीने शहरात प्रभावी मार्गक्रमण केले.

यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व चार हुतात्मा स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शेवटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.

मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असतानाही सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते देशप्रेमाने ओथंबून या रॅलीत सहभागी झाले होते.

या प्रसंगी आपल्या भाषणात राजाभाऊ सरवदे म्हणाले, “22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त करून त्याचा बदला घेतला. पाकिस्तानकडून असे हल्ले सातत्याने होत राहणार असतील, तर भारतीय सैन्याने युद्ध करून पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा.”

या युद्धात महार बटालियनसह तिन्ही दलांच्या (थलसेना, नौसेना, वायुसेना) जवानांनी दाखवलेले शौर्य उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कडून विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी सोमनाथ भोसले,रवी गायकवाड,सुनील सर्वगोड,अतुल नागटिळक सर्व तालुका अध्यक्ष व शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते…

Previous Post

राज्यातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द ; फडणवीस सरकारचा धाडसी निर्णय

Next Post

फोमरा मूकबधिर विद्यालयास रोटरी ग्लोबल कडून अनमोल भेट

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
फोमरा मूकबधिर विद्यालयास रोटरी ग्लोबल कडून अनमोल भेट

फोमरा मूकबधिर विद्यालयास रोटरी ग्लोबल कडून अनमोल भेट

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026