• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

Yes News Marathi by Yes News Marathi
October 7, 2026
in इतर घडामोडी
0
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
0
SHARES
3
VIEWS

राज्यातील सर्वात मोठ्या अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यातील दोन आरोपींना मुंबई येथील मे. उच्च न्यायालयाने दि. ०५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशान्वये जामीनावर मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. संदीप यादव आणि देवेंद्र यादव (दोघे रा. दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत.

दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी क्राइम ब्रँच युनिट १, पुणेचे पोलिस निरीक्षक रमेश तापकीर आणि श्री शबीर सय्यद यांना सोमवार पेठ येथे संशयित आरोपी वैभव माने हा ५०० ग्रॅम Mephedrone / मेफेड्रॉन या अंमली पदार्थासह आढळुन आला. त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने हे अंमली पदार्थ विश्रांतवाडी येथील हैदर शेख याचेकडुन आणल्याचे सांगितले. तेव्हा हैदर शेखकडुन पोलिसांना १२५० ग्रॅम M.D. ड्रग्ज मिळाले. तिन्ही आरोपीना अटक करून समर्थ पोलिस स्टेशन येथे NDPS Act sec.8(c), 22(C) आणि २९ अन्वये ३८/२०२४ हा गुन्हा नोंदविण्यात आला.

पुढील तपासात पोलिसांना माहिती मिळाली की दोन टेम्पो चालकांनी कुरकुंभ एम.आय.डी.सी., धानोरी, सांगली आणि दिल्लीला या ड्रग्जची वाहतुक केली आहे. त्यावेळी पोलीसांनी कुरकुंभ एम.आय.डी.सी. येथील एका केमिकल कंपनीवर छापा टाकुन ६६३ किलो M.D. जप्त केला. तसेच दिल्ली येथे जाऊन दिवेश भुटानी व संदीप बसोया या दोन आरोपींकडुन ३१९ किलोग्रॅम M.D. जप्त केले. दिल्ली येथील तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांना एका घरात ६३१ किलो M.D. सापडले. दिल्लीतील अटक केलेल्या आरोपीने पोलीसांना सांगितले की, ‘तो हे ड्रग्ज संदीप यादव याच्या कुरियर कंपनीमध्ये द्यायला निघाला होता व देवेंद्र यादव हा संदीप यादव यांच्या कुरियर कंपनीत मॅनेजर आहे. सदरचा माल लंडन स्थित आरोपी विरेंदर याच्या सांगण्यावरुन लंडनला पाठवणेसाठी संदीप यादव याचेकडे घेऊन जात होते.’ दरम्यान पोलीसांनी सांगली येथील एका गोडाऊनमधुन देखील १४८ किलो M.D. ड्रग्जचा साठा जप्त केला. त्यानंतर सदर गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने त्याचा तपास NCB (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) ने हाती घेतला. संपुर्ण कारवाईत एकुण १८३७.८४ कि.ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले ज्याची त्यावेळची किंमत सुमारे ३००० कोटी रुपये असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे.

पुणे सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर संदीप यादव व देवेंद्र यादव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. “केवळ सह-आरोपींच्या जबाबाच्या आधारे या आरोपींना अटक केली आहे, आरोपींनी लंडनला ड्रग्ज पाठवल्याचा संपुर्ण दोषारोप पत्रात कोणताही पुरावा नाही, आरोपींना अटक करताना त्यांना अटकेची कारणे लेखी स्वरुपात दिली नाहीत, आरोपींविरुद्ध कारवाई करताना अंमली पदार्थ कायद्याचे कलम ४२ प्रमाणे पोलिसांना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केलेले नाही” असा युक्तीवाद आरोपीचे वकिल अॅड. अतुल आर. पाटील यांनी केला. मे. उच्च न्यायालयाने आरोपींना जामीन देताना ‘आरोपींविरुद्ध दोषरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे येथील विशेष सत्र न्यायालयाने पोलिसांना दिलेली मुदतवाढ ही बेकायदेशीर व चुकीची असल्याचे नमुद करुन आरोपींना त्वरीत जामीनावर मुक्त करण्याचे’ आदेश दिले आहेत.

याकामी आरोपीचे वकिल अॅड. अतुल आर. पाटील यांना अॅड. तन्मय जाधव, अॅड. रमणजित सिंग, अॅड. अमोल शेळके, अॅड. ऋषिकेश गव्हाणे यांनी सहाय्य केले

Previous Post

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

Next Post

विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न

Related Posts

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
इतर घडामोडी

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना
इतर घडामोडी

हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

October 6, 2026
अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख : मंत्री उदय सामंत
इतर घडामोडी

अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख : मंत्री उदय सामंत

October 6, 2026
स्वाद आणि वेगवान प्रवासाचे उत्तुंग उड्डाण ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायटेक फ्लाईट किचन सुरू..
इतर घडामोडी

स्वाद आणि वेगवान प्रवासाचे उत्तुंग उड्डाण ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायटेक फ्लाईट किचन सुरू..

October 6, 2026
Next Post
विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न

विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

October 7, 2026
आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

October 7, 2026
पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

October 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026