ऐन सणासुदीच्या काळात आणि दिवाळीच्या तोंडावर तूर , मूग हरभरा ,उडीद आणि मटकीच्या दरात किलोमागे वीस ते पंचवीस रुपयांची वाढ झाली आहे .
राज्यासह प्रमुख उत्पादक पट्ट्यातील कमी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीचा फटका आता धान्य बाजाराला बसू लागलाय .अवघ्या महिला भरात कडधान्यांच्या आणि धान्यांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. खरीप हंगामातील डाळींच्या उत्पादनावरही याचा परिणाम झाला असून नवीन मालाची आवक अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट नक्कीच कोलमडणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तुरडाळीचे दर वाढल्याने तूर डाळीचे दरही तेजित आहेत तसेच तांदळाच्या उत्पादनावर ही याचा परिणाम झाला आहे त्यामुळे तांदळाच्या विविध प्रकारांच्या दरात मागील महिन्याभरात घाऊक बाजारात हजार ते बाराशे रुपयांची क्विंटल मागे तेजी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.











