• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 7, 2026
in मुख्य बातमी
0
पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी
0
SHARES
0
VIEWS

पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे

सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026 पारदर्शक व नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक साहित्य वाटपाचा आराखडा काटेकोरपणे तयार करावा आणि 21 ऑक्टोबर रोजी रामवाडी गोडाऊन येथे तालुकास्तरावर व 22 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप पूर्ण करावे, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, प्रांताधिकारी सुमित शिंदे, एनआयसीचे जिल्हा सूचना अधिकारी रवी पवार , जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी देठे, तहसीलदार महसूल दिनेश पारगे, तहसीलदार सरस्वती पाटील यांच्यासह संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध विषयांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. या अधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक खर्च नियंत्रण, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतदान कर्मचारी प्रशिक्षण, वाहन व्यवस्था, निवडणूक निरीक्षक व्यवस्था, निवडणूक साहित्य, मतदार यादी वितरण, मीडिया कक्ष, टपाली मतपत्रिका, मतपत्रिका छपाई व वाटप, संगणक व कम्युनिकेशन, जॉइंट चेकिंग, स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्राची तयारी, मतदान केंद्रांवरील आरोग्य सुविधा, जिल्हा आराखडा, भोजन व्यवस्था, स्वीप कार्यक्रम तसेच वेबकास्टिंग आदी कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

साहित्य वाटपाचा आराखडा काटेकोरपणे करावा – वाहन व्यवस्था व वेळापत्रक जाहीर
निवडणूक साहित्य वाटपाचा आराखडा काटेकोरपणे करावा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी यांनी दिल्या. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांची वेळेत व्यवस्था करावी व वाहतूक आराखडा तयार करावा.

निवडणूक साहित्याचे वाटप दि. 21 ऑक्टोबर रोजी रामवाडी गोडाऊन येथे तालुकास्तरीय यंत्रणांना करण्यात येईल. त्यानंतर दि. 22 ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय यंत्रणांनी निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रनिहाय निवडणूक साहित्याचे वाटप करावे, असे निर्देश देण्यात आले.

आरोग्य, भोजन व स्वीपवर भर – मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधा व भोजन व्यवस्था व्यवस्थितपणे असली पाहिजे, यासाठी आरोग्य विभाग व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे. महानगरपालिका व जिल्हा परिषदेने स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून मतदारांमध्ये जनजागृती करावी.

प्रत्येक अधिकाऱ्याने अत्यंत जबाबदारीने काम करून निवडणुका यशस्वीपणे पार पडतील, त्या पद्धतीने नियोजन ठेवावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिले.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यातील मतदान केंद्रांची तालुका निहाय माहिती अशी-

सोलापूर जिल्ह्यात एकूण १९३ मतदान केंद्रे असून त्यापैकी पदवीधरची ११७ व शिक्षकची ७६ केंद्रे आहेत.

२४४ करमाळा विधानसभा मतदार संघात पदवीधरची १० केंद्रे (क्र. १६१ ते १७०) व शिक्षकची ८ केंद्रे (क्र. ७३ ते ८०) अशी एकूण १८ केंद्रे. २४५ माढा मध्ये पदवीधरची १३ केंद्रे (१७१ ते १८३) व शिक्षकची ९ केंद्रे (८१ ते ८९) एकूण २२ केंद्रे. २४६ बार्शी मध्ये पदवीधरची ११ केंद्रे (१८४ ते १९४) व शिक्षकची ९ केंद्रे (९० ते ९८) एकूण २० केंद्रे. २४७ मोहोळ (SC) मध्ये पदवीधरची ११ केंद्रे (१९५ ते २०५) व शिक्षकची ७ केंद्रे (९९ ते १०५) एकूण १८ केंद्रे. २४८ सोलापूर शहर उत्तर* मध्ये पदवीधरची ८ केंद्रे (२०६ ते २१३) व शिक्षकची २ केंद्रे (१०६, १०७) एकूण १० केंद्रे. २४९ सोलापूर शहर मध्य* मध्ये पदवीधरची ४ केंद्रे (२१४ ते २१७) व शिक्षकचे १ केंद्र (१०८) एकूण ५ केंद्रे. २५० अक्कलकोट मध्ये पदवीधरची १० केंद्रे (२१८ ते २२७) व शिक्षकची १० केंद्रे (१०९ ते ११८) एकूण २० केंद्रे. २५१ सोलापूर दक्षिण मध्ये पदवीधरची १० केंद्रे (२२८ ते २३७) व शिक्षकची ६ केंद्रे (११९ ते १२४) एकूण १६ केंद्रे. २५२ पंढरपूर मध्ये सर्वाधिक पदवीधरची १५ केंद्रे (२३८ ते २५२) व शिक्षकची ९ केंद्रे (१२५ ते १३३) एकूण २४ केंद्रे. २५३ सांगोला मध्ये पदवीधरची १२ केंद्रे (२५३ ते २६४) व शिक्षकची ९ केंद्रे (१३४ ते १४२) एकूण २१ केंद्रे. २५४ माळशिरस (SC) मध्ये पदवीधरची १३ केंद्रे (२६५ ते २७७) व शिक्षकची ६ केंद्रे (१४३ ते १४८) एकूण १९ केंद्रे.

Previous Post

विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न

Next Post

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

Related Posts

विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न

October 7, 2026
सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!
मुख्य बातमी

सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!

October 7, 2026
आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!
मुख्य बातमी

आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!

October 6, 2026
सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!
मुख्य बातमी

सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

October 6, 2026
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन
मुख्य बातमी

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
मुख्य बातमी

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

October 5, 2026
Next Post
आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

October 7, 2026
आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

October 7, 2026
पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

October 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026