महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये आधीच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असतानाच रिझर्व्ह बँकेनेही सर्वसामान्यांना झटका दिला आहे. बँकेकडून बुधवारी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज, पर्सलन लोनवरील व्याजदरांत वाढ होणार आहे.
परिणामी कर्जाच्या EMI साठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात वाढ झाली होती. आरबीआयचे गव्हर्नरने रेपो दरात 25 बेसिस पॉईंटसची वाढ करण्याची घोषणा केली. यामुळे आता वाहन कर्ज , गृहकर्ज आणि इतर कर्ज महाग होणार. सर्वसामान्य कर्जदारांवर मोठा भार पडेल. आता कर्जाचा हप्ता (EMI) वाढेल. महागाईचा कहर असतानाच आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे











