हिरज वन्यजीव हद्दीतील गट क्र. ११८ येथे रेहेकुरी येथून आणलेल्या ‘मारवेल’ जातीच्या तब्बल ५,००० रोपांची गवत लागवड गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे.
ही लागवड उपवनसंरक्षक किशोर वाबळे वनपरिक्षेत्र अधिकारी कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वनविभागाच्या टीमसह वनमजूर तसेच वन्यप्रेमी शाहरुख पाटील व प्रसाद बोलदे यांच्या सहभागातून करण्यात येत आहे.लागवड सुरू असतानाच वरुणराजानेही हजेरी लावत पावसाची बरसात केली. मात्र त्यानंतर पाऊस थांबल्याने नव्याने लागवड केलेली रोपे जळू नयेत आणि त्यांची योग्य वाढ व्हावी यासाठी स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. रोपांची निगा राखण्यासाठी घेतली जाणारी ही काळजी निश्चितच कौतुकास्पद आहे.




विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आदरणीय प्रविणसिंह परदेशी यांचे हे एक स्वप्न होते—हिरज परिसरात वन्यजीवांसाठी नैसर्गिक खाद्य व अधिवास उपलब्ध व्हावा. आज हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहायला मिळत आहे.वन्यजीवांच्या संवर्धनासाठी उचललेले हे पाऊल केवळ गवत लागवड नसून, वन्यजीवांना सुरक्षित आणि समृद्ध अधिवास निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या स्तुत्य उपक्रमासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कोरे , त्यांची संपूर्ण टीम, वनमजूर आणि सर्व वन्यप्रेमींचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
“निसर्ग वाचला, तरच वन्यजीव वाचतील… आणि वन्यजीव वाचले, तरच आपली जैवविविधता समृद्ध राहील!”











