सोलापूर : सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विकसित होत असलेल्या “मिल्क अँड मिलेट व्हिलेज – भालेवाडी” येथे विविध पर्यटनविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पर्यटन समिती सदस्य, महिला बचत गट तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ मॅडम, तालुका उपकृषी अधिकारी प्रशांत काटे साहेब, ITDP चे प्रकल्प समन्वयक रोहित आदमाने, कृषी पर्यटन तज्ञ अविनाश एखंडे, क्षेत्र समन्वयक दादासाहेब खाडे, उमेद तालुका व्यवस्थापक उमेश डांगे, उमेद प्रकल्प व्यवस्थापक लिंगराज शरणार्थी, प्रा. डॉ. राजाराम पवार व त्यांचे सर्व सहकारी तसेच श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
तसेच मौजे सरकोली येथील पर्यटन टीम, जि.प. प्राथमिक शाळा भालेवाडीचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, श्रीराम भजनी मंडळ, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर, पोलीस पाटील तसेच मंगळवेढा पंचायत समितीचे सर्व ग्रामविकास अधिकारी यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास भालेवाडीचे सरपंच डॉ. श्रीकांत दवले, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय गायकवाड, उपसरपंच उषाताई गवळी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गावातील तरुण वर्ग, महिला भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाच्या माध्यमातून भालेवाडी गावाचा “मिल्क अँड मिलेट व्हिलेज” म्हणून पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येत असून, स्थानिक कृषी, दुग्धव्यवसाय, मिलेट्स, ग्रामीण जीवनशैली व स्थानिक संस्कृती यांचा पर्यटनाशी समन्वय साधून गावातील स्थानिक पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.











