सोलापूरचा ए यक्यू आय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स घातक अवस्थेत पोहोचल्याचे सकाळने निदर्शनास आणून दिले.सोलापूरचा एकेकाळी धुळीच्या प्रदूषणामध्ये भारतामध्ये तिसरा नंबर आल्याने गेल इंडिया या कंपनीने प्रदूषण मोजण्याचे यंत्र सोलापूरकरांना दान दिले जेणेकरून ते पाहून पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास सोलापूरकर बाध्य होतील.परंतु शहराचा ए कयु आय घातक अवस्थेत पोहोचला तरीही यावरती कोणतीही उपाययोजना करण्याचे योजलेले दिसत नाही.
महाराष्ट्रात चंद्रपूर येथे फुफुसाच्या कॅन्सरचे रुग्ण अधिक आढळल्याची नोंद आहे कोळसा खाणी व इतर प्रकल्पामुळे वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात कोळशाचे व इतर घटक वाढल्याने श्वसन विकार व फुफुसाचे कर्करोग त्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले महाराष्ट्राचा भारतामध्ये कर्करोगा च्या यादीमध्ये दुसरा नंबर आहे.प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश असला तरी तेथील लोकसंख्या अधिक असल्याने हे साहजिकच आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये मुंबई व पुणे या शहरांमध्ये सर्वाधिक कॅन्सर रुग्णाची नोंद झाली आहे. चर्चा फक्त कॅन्सरचे औषधे किती महाग आहेत? यावरती सीमित असते किंवा आहे. कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना करतो यावरती कुठलीही चर्चा वा उपायोजनावरती खर्च होताना दिसत नाही.वाढते औद्योगीकरण, वाहने,वीज प्रकल्प आदी मधून तयार होणाऱ्या प्रदूषणाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. त्याचा परिणाम मानवी शरीरावरती होत असून वेळीच पर्यावरण,शुद्ध हवा,शुद्ध पाणी यावर आपण लक्ष दिले नाही तर सर्व खर्च औषध उपचार यावरतीच करावा लागेल. पाठीमागे सकाळनेच उजनीच्या पाण्यामध्ये किती घातक विषारी रसायनांचे प्रमाण आहे हे आकडेवारी सह दिले होते. परंतु कोणीही याकडे प्राथमिक गरज म्हणून पाहत नाही. उजनी मधून येणारे अनेक विषारी रसायने सोलापूर कर रोज पिऊन पचवित आहेत. परिणामी पोटाचे विकार, आतड्याच्या कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. हवेमध्ये कार्बन मोनॉक्साईडचे, सल्फर डाय-ऑक्साइड चे नायट्रोजन डाय-ऑक्साइडचे घटक वाढत असून धुळीचे कण म्हणजे एसपीएम ही प्रतिघन मीटर म्हणजे एक बाय एक मीटर मध्ये 130 ते 150 क्युबिक घन इतके धुळीचे कण आढळले आहेत. याची कमीत कमी संख्या पन्नास पर्यंत असेल तर ते हेल्दी आहे असे मानक आहे . कार्बन मोनॉक्साईड हे त्वरित रक्तामध्ये मिसळते ऑक्सिजन ऐवजी कार्बन मोना ऑक्साईड रक्त पेशी सोबत सर्व शरीरात पसरते. कारखाने,जळणारे लाकूड,इंजिन ऑइल, जळणारा कोळसा यातून कार्बन मोना ऑक्साईड जास्त तयार होते. श्वासोच्छश्वासाद्वारे शरीरात जाऊन शरीरामध्ये दाह, सूज निर्माण करते. त्यातून पुढे कर्कजन्य आजाराची सुरुवात होते. सल्फर डाय-ऑक्साइड ही असाच विषारी वायू आहे त्यामुळे फुफ्फुसांना श्वासनलीकेला सूज येते. श्वासनलिकेतील संरक्षण करणाऱ्या पेशी नष्ट होतात त्यामुळे श्वासनलिकेतून परागण, धुळीचे कण व इतर स्मॉल पार्टिकल मटेरियल थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचून फुफुसाला हानिकारक ठरतात. त्यामुळे अस्थमा सीओपीडी अलर्जी सर्दी आधी व्याधी होत आहेत. उपाययोजना
1) दुचाकी, तिचाकी रिक्षा इत्यादीचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे. शहर प्रदूषण मुक्त ठेवायचे असेल तर प्रत्येकाने आपले योगदान देणें गरजेचे आहे. आत्ता भेसळी विरुद्ध मा. मुंढे साहेब कार्यतात्पर आहेत तसेच प्रत्येकाने आपल्या शहराची हवा शुद्ध कशी राहील यांचा विचार केला पाहिजे.
2) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे जेणेकरून लोक वैयक्तिक वाहनांचा वापर कमी करतिला. कमी वाहने रस्त्यावर असतील तर प्रदूषण ही कमी होईल. कोविड काळामध्ये पर्यावरणातील प्रदूषण बरेच कमी झाले होते कारण वाहने फक्त अत्यावश्यक सेवेचीच रस्त्यावर धावत होती.
3) कारखान्यांचे धुराडे वा चिमण्या वेळोवेळी अपग्रेड करून घेणे. तयार होणारा धूर थेट हवेत न सोडता प्रक्रिया करून सोडावा. कडक निर्बन्ध व काटेकोर नियमांचे पालन करने गरजेचे.
सर्वात महत्त्वाचे व जनसामान्यांच्या हातात असलेले पर्यावरण हवा शुद्ध ठेवणारे यंत्र म्हणजे “झाडे लावणे” झाडे हे ऑक्सिजन देतात, हवेतील आर्द्रता टिकवतात, कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतात, हवेतील आर्द्रता धरून ठेवल्यामुळे धूळ नियंत्रणात राहते.जिथे जास्त झाडे तिथे जास्त पाऊस हे समीकरण आहे त्यामुळे पर्यावरणाबरोबरच निसर्गाचाही समतोल राखण्यास झाडे मदत करतात.
डॉ. विद्याधर सूर्यवंशी
drvps226@gmail.com











