सदर स्पर्धा ह्या तीन गटांमध्ये घेण्यात आले असून त्यात गट क्रमांक १ इयत्ता पाचवी ते सातवी, गट क्रमांक २-आठवी ते दहावी आणि गट क्रमांक ३- अकरावी बारावी असे गट पाडण्यात आले. गट क्रमांक १ (५वी ते ७वी) करिता विषय १) माझ्या स्वप्नातील पर्यावरण पूरक गणेशोत्सव २) बाप्पाच्या कानात मी काय सांगणार? ३) डीजे नको परंपरिक वाद्याचा गजर हवा.
गट क्रमांक २ (८वी ते १०वी) करिता विषय १. गणेशोत्सव वैभव की कर्कश गोंगाट. २. लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव ३. भारताची गरज संस्कृतीयुक्त गणेशोत्सव.
गट क्रमांक 3. (११वी ते १२वी) करिता विषय क्रमांक १. गणेशोत्सव लोकोत्सव की राजकीय शक्ती प्रदर्शन? २. तरुणाचा उत्सव विधायकतेचा की दिशाहीनतेचा? ३. प्रदूषण मुक्त आणि संस्कृत गणेशोत्सव.


अशा विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सदर या स्पर्धेत गट क्रमांक एक इयत्ता पाचवी ते सातवी या गटातून जिल्हा परिषद मुलींची शाळा कुंभारी या शाळेतील सौजन्या कट्टे हिने प्रथम क्रमांक पटकाविले. तर आय. एम. एस. स्कूल मधील अनघा जाधव द्वितीय तर अंजली जगताप तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
गट क्रमांक 2 इयत्ता आठवी ते दहावी गटातून सेवासदन हायस्कूल मधील आर्या सुरडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. तर अरुण शाळेतील वर्षा साई द्वितीय, आणि पोलीस पब्लिक स्कूल मधील सुमेधा बडूरकर यांनी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. गट क्रमांक 3 इयत्ता अकरावी ते बारावी या गटातून श्री सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निक मधील अफिया बनेवाले हिने प्रथम क्रमांक पटकाविले तर श्रेया माळी द्वितीय आणि सेवासदन ज्युनिअर कॉलेज मधील आफरीन सय्यद हिने तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक ₹. १५००/- रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक ₹. १०००/रोख , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. तृतीय क्रमांक ₹. ७०० रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सर्व विद्यार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी कृष्णा फाउंडेशनचे संस्थापिका डॉ. जानवी माखिजा, सचिव प्रशांत अपराध,संजीवनी पब्लिकेशन चे संस्थापक सिद्राम तट्टे, पद्म कमळ परिवार चे अध्यक्ष गोपीकृष्ण वड्डेपल्ली, सचिवा माधवी अंदे , कृष्णा फाउंडेशनचे ख़जिनदार राज माखीजा ,राहुल बिराजदार,प्रसाद खोबरे ,दीपक आहुजा आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसाद अतनूरकर, सोनाली गिरी ,उषा जमादार, प्राध्या.रेवणसिद्ध हल्लोली , सचिन जगताप ,रश्मी मोहोळकर . जयश्री कौप्पा,गंगा बाळीकाई, साक्षी तट्टे, प्रथमेश कासार यांनी काम पाहिले.
सदर ही वक्तृत्व स्पर्धा यशस्वीतेसाठी श्रीदेवी माने , परिणीती माने, सोनाली जगताप, मधुरा दयावनपल्ली, गोदावरी धुळम, अर्चना सलवारू, रजनी सोनवणे, गणेश बोडडू, यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर या स्पर्धेत १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.त्याप्रसंगी पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.











