खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये पार पडलेली दिशा कमिटीची बैठक आज विविध मुद्द्याने चांगलीच गाजली. या बैठकीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ज्योती वाघमारे,जिल्हाधिकारी एस कार्तिकेयेन, झेडपीचे सीईओ कुशल जैन, उपस्थित होते या बैठकीला अभिजीत पाटील हे एकमेव आमदार उपस्थित होते. दुपारी दोन वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी सहा पर्यंत सुरू होतील. उजनी धरणात वाढलेला गाळ, प्रदूषण, सोलापूर जिल्ह्यातील लोड शेडिंग, झेडपीच्या शाळांची दुरावस्था, जल जीवन मिशनच्या कामांची बोंबाबोंब, सोलापूर शहरात समांतर जलवाहिनी होऊन देखील पाच ते सहा दिवसात होणारा पाणीपुरवठा याबाबत या बैठकीत अनेक अधिकाऱ्यांना खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,खासदार ज्योती वाघमारे,आमदार अभिजीत पाटील यांनी धारेवर धरले . जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी एकमुखी मागणी करून यावेळी ठराव करण्यात आला. गेल्या वर्षी साडेसहाशे किलोमीटर पाऊस झाला होता मात्र यंदाच्या आजवर 352 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्त 194 मिलिमीटर पाऊस झाला आहे. महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे हे या बैठकीला न आल्यामुळे आणि खासदार शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.









