• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

Yes News Marathi by Yes News Marathi
September 8, 2026
in मुख्य बातमी
0
एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
0
SHARES
0
VIEWS

अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार

सोलापूर – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासह इतर 13 राज्यांमध्ये सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल परीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार याद्यांचे शुद्धीकरण केले जात आहे. मतदार यादीत प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश करणे तसेच अपात्र नागरिकाला मतदार यादीतून वगळणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. तरी सोलापूर जिल्ह्याच्या मतदार यादीत एसआयआर अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी सोबत आयोजित आढावा बैठकीत तेली उगले मार्गदर्शन करत होत्या. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अप्पर आयुक्त तथा मतदार यादीचे नोडल अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, यांच्यासह सर्व मतदार नोंदणी अधिकारी तसेच प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


मतदार नोंदणी निरीक्षक तेली उगले पुढे म्हणाल्या की, सोलापूर जिल्ह्याची मतदार यादी अंतिम करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे. राजकीय पक्षांचे बीएलए हे बूथ लेवल ऑफिसर यांना मदत करतच आहेत. तसेच राजकीय पक्षांनी ज्यांची नावे सध्याच्या प्रारूप मतदार यादीत नाहीत अशा लोकांचे एक गठ्ठ्याने अर्ज आणून देऊ नये, तसे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचा मतदारांना मतदान यादीतून वगळणे हा हेतू नसून मतदार याद्यांचे शुद्धीकरण करणे हा हेतू आहे. त्यामुळे एकही पात्र मतदार यादीतून वगळला जाणार नाही या दृष्टीने सर्व मतदान नोंदणी अधिकारी तसेच बीएलओ काम करत आहेत. तसेच या अनुषंगाने दावे व हरकती दाखल करताना सोबत पुरावे ही सादर करावेत, असेही तेली उगले यांनी सांगितले. मतदार यादी निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने आपली नियुक्ती केली असून सोलापूर जिल्ह्यात या अंतर्गत तीन वेळा भेट दिली जाणार असून राजकीय पक्षांनी त्यांच्या काही समस्या अडचणी असतील तर त्या वेळोवेळी मांडाव्यात, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.


प्रारंभी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासनाने एसआयरअंतर्गत केलेल्या कामकाजाची माहिती दिली.जिल्ह्यात 17 जून 2026 रोजी एकूण मतदार संख्या 39,41,095 इतकी होती. विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत मतदारांची संख्या 33,18,424 इतकी झाली आहे. या प्रारूप यादीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ASDD यादीत 6,22,671 मतदारांचा समावेश आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्ह्यात यापूर्वी 3,723 मतदान केंद्रे होती. त्यामध्ये 17 नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून, आता जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या 3,740 झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजकीय पक्षांच्या सूचना, प्रश्न-

बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीत अनुपस्थित अथवा स्थलांतरित झालेल्या मतदारांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही कशी करणार, तसेच एकाच कुटुंबातील सदस्यांचे मतदान एकाच मतदान केंद्रावर राहावे, मतदार यादी अचूक कराव्यात, पात्र मतदार वगळले जाणार नाहीत या दृष्टीने प्रशासनाने सजग राहावे. तसेच मतदार यादी शुद्धीकरणासाठी प्रशासनाला राजकीय पक्षांनी तसेच प्रत्येक पक्षाच्या बुथ लेवल असिस्टंट यांनी सहकार्य केले असून ते तसेच पुढेही करतील असे सांगितले.

SIR कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक-


जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटी 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना 24 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आली. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, दावे व हरकती दाखल करण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

Previous Post

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

Related Posts

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
मुख्य बातमी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026