• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आष्टी उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण करून मोहोळ तालुक्यातील ९ गावांना पाण्याची व्यवस्था करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 1, 2022
in मुख्य बातमी
0
आष्टी उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण करून मोहोळ तालुक्यातील ९ गावांना पाण्याची व्यवस्था करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क :- आष्टी उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण करून याद्वारे मोहोळ तालुक्यातील ९ गावांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मंजूरी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच भोगावती खो-यात पर्जन्यमान कमी असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्याच्या भोगावती नदीकाठचा भाग सिंचनाखाली येण्यासाठी सीना नदीवरून भोगावती नदीचे पुनर्भरण करणे, सीना-भोगावती जोडकालव्याद्वारे जोडून भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यामध्ये पाणी सोडून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

सोलापूर जिल्ह्यातील सीना-भोगावती आणि आष्टी उपसा सिंचन योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाच्या सचिव शैला ए, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत हे उपस्थित होते. तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य अभियंता ए टी धुमाळ तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आष्टी उपसासिंचन योजनेतून मोहोळ तालुक्यातील ९ गावांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी आहे. येवती गावाजवळील तलावातून येवती तलावाच्या येव्यातून व उजनी (भीमा)च्या डाव्या कालव्यातून येवती तलावात पाणी घेऊन १.५५ अघफू पाणी आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील १५ गावे, माढा तालुक्यातील २ गावातील क्षेत्रावर योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाची वाडी, अनगर या ९ गावांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी आहे. या योजनेस ०.५८ अघफू पाणी उपलब्ध झाल्यानंतर या गावांतील ४५९० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

भोगावती खो-यात पर्जन्यमान कमी असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्याच्या भोगावती नदीकाठच्या क्षेत्रातील भाग सिंचनाखाली येण्यासाठी सीना नदीवरून भोगावती नदीचे पुनर्भरण करणे, सीना-भोगावती जोडकालव्याद्वारे जोडून पाणी भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यामध्ये सोडून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी देण्यासंदर्भात बार्शी व मोहोळ तालुक्यातून मागणी आहे. बार्शी तालुका हा आवर्शनप्रवण क्षेत्रात येत असल्याने भोगावती नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणे आवश्यक असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Previous Post

पहा कोणत्या प्रभागात.. कोणते आरक्षण… सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर

Next Post

बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रांचा परवाना होणार रद्द – अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रांचा परवाना होणार रद्द – अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव

बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रांचा परवाना होणार रद्द - अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : पालकमंत्री नगरसेवकांना देणारा आज कान मंत्र

June 10, 2026
मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

June 10, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026