• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रांचा परवाना होणार रद्द – अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2022
in इतर घडामोडी
0
बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रांचा परवाना होणार रद्द – अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: जिल्ह्यात ग्रामीण भागात सरकारी एक आणि खाजगी 185 असे 186 तर सोलापूर शहरात सरकारी आठ आणि खाजगी 183 असे 191 नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर्स आहेत. या केंद्रांची तपासणी विशेष पथकामार्फत करण्यात येत आहे. नोंदणीकृत केंद्रांसोबत बेकायदेशीरपणे प्रसूतीपूर्व सोनोग्राफी करून स्त्रीभ्रूण हत्या करीत असणाऱ्या नोंदणी नसलेल्या केंद्रावर कडक कारवाई करून परवाना रद्द करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केल्या.

भ्रूण हत्येला प्रतिबंध घालण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायद्यांतर्गत (पीसीपीएनडीटी) दक्षता पथक समितीच्या बैठकीत जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, पीसीपीएनडीचे समन्वयक क्षमा डबीर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

जाधव यांनी सांगितले की, तपासणी पथकाने सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करताना ती सुयोग्य पद्धतीने करावी. केंद्रांच्या तपासणीचे प्रमाण वाढवावे. सील केलेल्या केंद्रांवर लक्ष ठेवा. सोनोग्राफी केंद्रातून स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार आढळून आल्यास त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी कायदेशीर सल्लागार त्वरित नेमावा. सोनोग्राफी केंद्रांची लवकरच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्रांनी एफ फॉर्म तातडीने भरायला हवा. केंद्राची तपासणी करून गुन्हे दाखल होऊन न्यायालयात केस टिकण्यासाठी पुरावे गोळा करा. यासाठी 15 जुलैनंतर कार्यशाळा आयोजित करून यामध्ये महसूल, वैद्यकीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी या सर्वांना माहिती देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

बेटी बचाओ अहवालानुसार जिल्ह्यात 0 ते 6 वर्षांचे लिंग गुणोत्तर 945 आहे. मुली वाचविण्यासाठी शासकीय यंत्रणांसोबत पालकांचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी पालकांमध्ये जाणीव जागृती करण्याच्या सूचनाही जाधव यांनी दिल्या.

ग्रामीणमध्ये 2007 पासून पीसीपीएनडीटीच्या 22 केसेस दाखल होत्या, यापैकी 14 निकाली तर आठ प्रलंबित आहेत. सोलापूर शहरात सात केसेस दाखल असून सहा निकाली तर एक प्रलंबित असल्याची माहिती डॉ. ढेले यांनी दिली. आमचीमुलगी.जीओव्ही.ईन या वेबसाईटवर एकही तक्रार दाखल झालेली नाही. आलेल्या तक्रारीचाही आढावा घेण्यात येत असल्याची माहिती डॉ. ढेले यांनी दिली.

Previous Post

आष्टी उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण करून मोहोळ तालुक्यातील ९ गावांना पाण्याची व्यवस्था करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

रमाई आवासची अपूर्ण बांधकामे जूनअखेर पूर्ण करा – सहायक आयुक्त कैलास आढे

Related Posts

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!
इतर घडामोडी

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
Next Post
रमाई आवासची अपूर्ण बांधकामे जूनअखेर पूर्ण करा – सहायक आयुक्त कैलास आढे

रमाई आवासची अपूर्ण बांधकामे जूनअखेर पूर्ण करा - सहायक आयुक्त कैलास आढे

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : पालकमंत्री नगरसेवकांना देणारा आज कान मंत्र

June 10, 2026
मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

June 10, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026