• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राजीव सातव यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला, कार्यकर्त्यांना शोक अनावर

Yes News Marathi by Yes News Marathi
May 17, 2021
in मुख्य बातमी
0
राजीव सातव यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला, कार्यकर्त्यांना शोक अनावर
0
SHARES
0
VIEWS

पुणे: काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी (16 मे) पहाटे कोरोनाने निधन झाले आहे. आज सोमवारी (17 मे) हिंगोलीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. खासदार राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरी येथील कोहिनूर या निवासस्थानातून मोकळ्या जागी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. सध्या त्यांचे पार्थिव कळमनुरी येथील कोहिनूर या निवासस्थानातून मोकळ्या जागी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात अनेक कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत आहेत.

कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
राजीव सातव यांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या जाण्यानं एक पोकळीच निर्माण झाली आहे. राज्याने एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसलं आहे, अशा शब्दात अनेक नेते मंडळींनी दु:ख व्यक्त केलं. हिंगोलीत काँग्रेससह अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे.

पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन
राजीव सातव यांचे काल पहाटे 4 वाजून 58 मिनिटाने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेली त्यांची कोरोना विरुद्धची झुंज अखेर काल संपली.

सातव यांचा अल्प परिचय
45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होतं. याशिवाय ते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यांवर बोलत असायचे.

चार वेळा ‘संसदरत्न’
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Previous Post

सोलापूर । मालवाहतूकीबाबत सुधारित आदेश…

Next Post

DRDO चे कोरोना प्रतिबंध औषध आजपासून मिळणार

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
DRDO चे कोरोना प्रतिबंध औषध आजपासून मिळणार

DRDO चे कोरोना प्रतिबंध औषध आजपासून मिळणार

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026