सोलापूर विद्यापीठात शिक्षक दिनानिमित्त 44 जणांचे रक्तदान!

0
17
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शिक्षक दिनानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप व अन्य.

सोलापूर, दि. 5- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 44 जणांनी रक्तदान केले.

मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी रक्तदान करणे अतिशय महत्त्वाचे असून यामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत होते. रक्तदान चळवळीत युवकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले.

विद्यापीठात शिक्षक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक आस्थापना विभागामार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला.