• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

2 मोटरसायकलीसह 290 लिटर हातभट्टी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
February 13, 2023
in इतर घडामोडी
0
2 मोटरसायकलीसह 290 लिटर हातभट्टी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
0
SHARES
1
VIEWS
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूरच्या पथकाने सोमवारी (दि. 13 ) शहर परिसरात 2 मोटरसायकलीवरुन हातभट्टी दारुच्या वाहतूकीचा गुन्हा नोंदविला असून 290 लिटर हातभट्टी दारु व 2 दुचाकी वाहने या कारवाईत जप्त करण्यात आली आहेत.

सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक संभाजी फडतरे यांनी त्यांच्या पथकासह एम्प्लॉयमेंट चौक हद्दीत पाळत ठेवली असता पांडूरंग दिगंबर चव्हाण (वय 32 वर्षे, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) या इसमास त्याच्या सुझुकी एक्सेस क्र. MH 13 DA 1342 दुचाकीवरुन दोन रबरी ट्यूबमध्ये 140 लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करतांना अटक केली. त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किंमतीसह सदुसष्ट हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांनी जवान शोएब बेगमपुरे यांचेसह सोलापूर हैदराबाद रोडवर जुना बोरामणी नाक्यासमोर पाळत ठेवून एका होंडा कंपनीच्या निळया रंगाच्या एक्सेस क्र. MH 13 DW 0602 या दुचाकीवरुन तीन रबरी ट्यूबमधून 150 हातभट्टी दारुची वाहतूक करतांना मुकेश खुबा चव्हाण (वय 33 वर्षे, रा. मुळेगाव तांडा) या इसमास अटक करुन त्याच्या ताब्यातून ब्याण्णव हजार आठशे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संभाजी फडतरे, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, जवान चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे व प्रियंका कुटे यांनी पार पाडली.
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारुविरोधात मोहिम तीव्र करण्यात आली असून फेब्रुवारी महिन्यात 66 गुन्ह्यात 15 वाहनांसह 103 लिटर देशी दारु, 54 लिटर विदेशी दारु, 12068 लिटर हातभट्टी दारु, 476 लिटर गोवा राज्यातील दारु, 480 लिटर ताडी, 15140 लिटर गुळमिश्रित रसायन असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आपल्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.
Previous Post

श्री गजानन महाराज (शे) सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा

Next Post

सोलापूर जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी सुनील कटकधोंड रुजू

Related Posts

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
Next Post
सोलापूर जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी सुनील कटकधोंड रुजू

सोलापूर जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी सुनील कटकधोंड रुजू

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026