सकल मराठा समाजाच्या रास्ता रोको मुळे वाहतूक ठप्प

0
14

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे शांततेच्या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत असताना त्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी आमानुष पने गोळीबार व लाठीमार करून आंदोलनातील सहभागी निष्पाप स्त्री ,पुरुष, तरुण, तरुणी, लहान मुले,यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्याचा निषेधार्थ सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा यांच्या तर्फे संपूर्ण जिल्हाभर रस्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.

ह्या शासन पुरस्कृत हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहरातील सोलापूर पुणे हाइवे वर बाळे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला विविध संघटना आणि राजकीय पक्ष्यांनी पाठिंबा दिला होता. यावेळी बोलताना माऊली पवार यांनी सांगितले की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत इलेक्शन नाही.असा मराठा समाजाने ठराव करावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे , अशोक निंबर्गी , बाबा कर्गुळे, विनोद भोसले , शिवसेनेचे शहर अध्यक्ष विष्णू कारमपुरी , जिल्हा अध्यक्ष पुरशोत्तम बरडे,
संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे , शिवाजी तात्या वाघमोडे, राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे , राजन जाधव ,सेवा संघाचे शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, गणेश देशमुख , बिज्जू प्रधाने, नाना काळे ,राजुभाई कुरेशी , मतीन बागवान ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, निर्मला शेलवणे , मनीषा नलावडे ,लता ढेरे , Dr. चव्हाण ,कस्पटे , महादेव गवळी, रामकाका जाधव, लहू गायकवाड , आबा सावंत , चव्हाण शेटजी , हेमंत पिंगळे ,शाहू सलगर , प्रकाश ननवरे ,पात्रे पैलवान, तिरुपती परकिपंदला , शिवाजीराव घाडगे गुरूजी , सुनील हुंबे , प्रताप कांचन, सुनील नागणे, चंद्रकांत शिंदे, यशवंत लोंढे, प्रताप चव्हाण , शक्ती सुरवसे, श्याम गांगर्डे, महादेव गवळी, चंद्रकांत पवार, राजू पवार, लक्ष्मण पवार,

यावेळी उपस्थित नेत्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना शासनाचा निषेध करून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी बोलताना विविध जाती धर्माच्या लोकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला.आंदोलनाला मराठा समाजातील सर्व वर्गातील लोक हजर होते.