• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2026
in इतर घडामोडी
0
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
0
SHARES
38
VIEWS

सोलापूर- पुणे येथे मिथेनॉलमिश्रित विषारी मद्य प्राशनामुळे घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, गावठी दारू विक्री आणि मिथेनॉलच्या गैरवापराविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात येत आहे. या संदर्भात पोलीस विभागासह सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्त व प्राधान्याने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले आहेत.

*मिथेनॉल अत्यंत घातक असल्याचा इशारा-
पुणे येथील घटनेत मिथेनॉल या विषारी रसायनाचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. मिथेनॉल हे अत्यंत धोकादायक असून त्याच्या सेवनामुळे कायमस्वरूपी अंधत्व, कोमात जाणे, मूत्रपिंड निकामी होणे तसेच मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यामुळे नागरिकांनी अवैध मद्य, रसायन मिसळलेली दारू किंवा ढाबे/टपऱ्यांवर विनापरवाना विकल्या जाणाऱ्या मद्याचे सेवन टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून करण्यात आले आहे.

*जनजागृतीसाठी व्यापक प्रचार मोहीम:–
मिथेनॉलयुक्त विषारी मद्याचे दुष्परिणाम आणि अवैध मद्यनिर्मितीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जाणार आहे.
महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत यांना घंटागाड्यांद्वारे ध्वनीफीत प्रसारित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विस्तृत प्रचार मोहीम राबवून अवैध मद्याचे धोके आणि कायदेशीर कारवाईबाबत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

*वीजजोडण्यांवर ‘तत्काळ’ कारवाईचा निर्णय-
अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्रांवर होणाऱ्या उत्पादनाला आळा घालण्यासाठी अधिकृत किंवा अनधिकृत वीजजोडण्या तात्काळ खंडित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी महावितरण विभागाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

*उत्पादन, खरेदी, साठवणूक आणि वितरणावर नजर-
मिथेनॉलचा गैरवापर रोखण्यासाठी उत्पादन, खरेदी, विक्री, साठवणूक आणि वितरण या सर्व टप्प्यांवर विशेष देखरेख ठेवली जाणार आहे. संशयास्पद व्यवहार आढळल्यास संबंधितांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याचे प्रशासनाचे स्पष्ट आदेश आहेत.

*गूळ खरेदी करणाऱ्यांचीही तपासणी-
अवैध मद्यनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या गूळ खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देखील तपासणी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुळाचा वापर अवैध मद्यनिर्मितीसाठी होणार नाही याची खात्री करण्याबाबत व्यापाऱ्यांना प्रशासनाने सूचना/आवाहन केले आहे.

*हातभट्टी निर्मितीचे उच्चाटन: संयुक्त मोहिमेची तीव्रता वाढवणार-
पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात संयुक्त कारवाया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. हातभट्टीचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी या कारवायांची तीव्रता वाढवण्यात येणार आहे.

*दारुबंदी कायद्यानुसार सहकार्य बंधनकारक
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 अंतर्गत अवैध मद्यनिर्मिती रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सहकार्य करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. माहिती लपविणे किंवा सहकार्य न करणे यासारख्या बाबी आढळल्यास मानधन बंद तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

*नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय-
विषारी रसायनांच्या गैरवापराबाबत किंवा अवैध मद्यनिर्मितीबाबत कोणतीही माहिती नागरिकांनी तात्काळ संबंधित विभागांना द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

ज्ञानेश्वरी माउलींची अमृतवाणी गर्जणार ७५० भक्तांच्या मुखातून

Next Post

सोलापुरसाठी राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी पटकावले ५ गोल्ड मेडल.

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
सोलापुरसाठी राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी पटकावले ५ गोल्ड मेडल.

सोलापुरसाठी राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी पटकावले ५ गोल्ड मेडल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026