• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2026
in Blog
0
१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण
0
SHARES
5
VIEWS

पुणे- भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या १९६२ या टोल-फ्री हेल्पलाइनने राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे जाळे बळकट केले आहे.

‘मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स’ म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून या उपक्रमाने विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या दारात पशुवैद्यकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून, यामुळे पशुधनाची वेळेवर, सुलभ व विश्वासार्ह काळजी घेणे शक्य झाले आहे.

या उपक्रमाच्या यशानंतर, भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी सेवा अधिक गतिमान करण्यासाठी ‘व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा’ सुरू केली आहे. या डिजिटल उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सेवा मिळवणे सोपे करणे, संवाद सुलभ करणे व रिअल-टाइम पशुवैद्यकीय साहाय्य प्रदान करणे हा आहे.

व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा

शेतकरी +९१९०६३१४२२९९ या क्रमांकावर संदेश पाठवून किंवा निश्चित केलेला क्यूआर कोड स्कॅन करून या चॅटबॉट सेवेचा लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांना त्यांच्या घरातूनच, व्हॉट्सॲपच्या अत्यंत सोप्या व वापरण्यास सुलभ इंटरफेसचा वापर करून जलद व सोयीस्कर पशुवैद्यकीय सल्ला आणि सेवा मिळाव्यात, अशा पद्धतीने हा चॅटबॉट डिझाइन करण्यात आला आहे.

शेतकरी +919063142299 या क्रमांकावर व्हॉट्सॲपवर “Hi” पाठवून खालील सेवा मिळवू शकतात: पशुधनाचे आजार, उपचार आणि लसीकरणाबाबत माहिती मिळवणे. पशुसंवर्धन आणि सरकारी योजनांची सविस्तर माहिती मिळवणे. चॅट, ऑडिओ कन्सल्टेशन आणि व्हिडिओ कन्सल्टेशन, टेलिकन्सल्टेशन या माध्यमांद्वारे पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधता येणार आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये: पशुवैद्यकीय टेलिकन्सल्टेशन सेवा, ऑडिओ व व्हिडिओ कॉलद्वारे सल्ल्याची सोय, पशुवैद्यकीय डॉक्टरांशी थेट संवाद,रुग्णालय व पशुवैद्यकीय सेवा डिरेक्टरीची उपलब्धता, सरकारी योजनांची माहिती, वारंवार विचारले जाणारे प्रश्न.  

प्रागतिक माहिती (ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६): ६१५ शेतकऱ्यांनी चॅटबॉटचा वापर करून संवाद साधला आहे. २०१ व्हिडिओ कन्सल्टेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.

उपक्रमाची उद्दिष्टे: संपूर्ण महाराष्ट्रात पशुवैद्यकीय सेवा वितरणाची यंत्रणा बळकट करणे. शेतकऱ्यांना वेळेवर व तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. डिजिटल सुलभता वाढवणे आणि सेवांचा विस्तार करणे.
तात्काळ संवाद व जलद प्रतिसाद यंत्रणा सक्षम करणे.

शेतकऱ्यांना होणारे फायदे: प्रवास न करता घरबसल्या पशुवैद्यकीय सेवांची उपलब्धता, पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद, सरकारी योजना व त्यांच्या फायद्यांविषयी जागरूकतेत वाढ, सेवा मिळवण्यासाठी लागणारा वेळ व खर्चात बचत आणि पशुधनाचे आरोग्य व उत्पादकतेत सुधारणा.

डॉ. किरण पाटील, आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य: शेतकऱ्यांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व संपूर्ण राज्यात कार्यक्षम, सुलभ आणि तंत्रज्ञान-आधारित पशुवैद्यकीय आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी BFIL आणि पशुसंवर्धन विभाग हा उपक्रम परिश्रमपूर्वक कार्यरत आहे. पशुपालकांना तात्काळ पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे, या उद्दिष्टाला पशुसंवर्धन विभागाने प्राथमिकता दिली असून, पशुपालक व शेतकरी बांधवांनी १९६२ या कॉलसेंटर सेवेचा अधिकाधीक लाभ घ्यावा.

Previous Post

जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026