• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 2, 2026
in इतर घडामोडी
0
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या १२ गावांतील मिळकतधारकांना मालमत्ता पत्रक उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी महानगरपालिकेकडून 5.00 कोटी रुपये नगरभूमापन विभागाकडे भरणा करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने सदर विभागाकडून झालेल्या तसेच यापुढील काळात महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत नगरभूमापन मोजणी कामकाजाकरीता मॅपेक्स नावाची एजन्सी नियुक्त करण्यात आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर आज सोलापूर महानगरपालिकेच्या कॉन्सिल हॉल येथे महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी उपमाहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थयी समिती सभापती रंजीता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अधिक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके, उपअधिक्षक भूमी अभिलेख सचिन पवार, मॅपेक्सचे सचिन कांबळे, नगररचना कार्यालयाकडील सहायक संचालक नगर रचना समीर शितोळे, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, उपअभियंता जोशी, यांच्या सह नगरसेवक, नगरसेविका उपस्थिती होते.

यावेळी सदर सादरीकरणाबाबत प्रस्तावना शकील शेख यांनी सादर केली तदनंतर उपअधिक्षक सचिन पवार यांनी सदर प्रक्रियेची सविस्तर माहिती देणारे सादरीकरण केले. या सादरीकरणामध्ये सर्वेक्षणाची उद्दिष्टे, नागरिकांना होणारे फायदे, आवश्यक ती लागणारी कागदपत्रे पुढील कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या १२ गावांमध्ये अत्याधुनिक ड्रोन व GIS तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक सर्वेक्षण करण्यात येत असून डिजिटल नकाशे तयार केले जात आहेत. या मोहिमेमुळे नागरिकांना ऑनलाइन मालमत्ता पत्रक उपलब्ध होणार असून मालमत्तेशी संबंधित वाद कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच मालमत्ता धारकांना प्रॉपर्टी कार्ड व सनद प्राप्त झाल्यानंतर बँक कर्ज, आर्थिक व्यवहार आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. नगरभूमापन मोहिमेअंतर्गत संबंधित मिळकतधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये अधिकार अभिलेख (७/१२), महानगरपालिका कर पावती, खरेदीखत (Sale Deed), सक्षम प्राधिकाऱ्यांचे आदेश, मान्य अभिहस्तांतरण (Deemed Conveyance), घोषणापत्र, सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र, बांधकाम मंजुरी नकाशा, वारसा हक्क प्रमाणपत्र, वीज बिल, पाणीपट्टी, आधार कार्ड आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “नगरभूमापन ही नागरिकांच्या मालमत्ता हक्कांना अधिकृत स्वरूप देणारी महत्त्वाची मोहीम आहे. सदर प्रभागातील नगरसेवकांनी त्यांचे प्रभागातील मिळकतदार व नगरभूमापन कडील कर्मचारी यांचेमध्ये समन्वय साधुन सदरचे मोजणी कार्यवाहीचे अनुषंगाने मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी सहकार्य करावे. नागरिकांच्या सहभागामुळे ही मोहीम यशस्वी होईल. सदरचे कामकाज नगरभूमापन विभागाने मनुष्यबळ वाढवून विहीत कालमर्यादेमध्ये पूर्ण करावेत अशा सूचना दिल्या. सदर प्रसंगी नगरसेवक प्रशांत पल्ली, . शिवानंद पाटील, नारायण बनसोडे, अनंत जाधव, नगरसेविका अर्चना वडनाल यांनी देखील सूचना केल्या. सदर सादरीकरणानंतर मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नगरभूमापन विभागास सदर कामकाजाकरीता महानगरपालिकेकडून नगररचना व मालमत्ता विभागाकडून समन्वय अधिकारी उपलब्ध करुन दिले जातील असे सांगून सदरची मोजणीची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडणेबाबत सूचना दिल्या. यानंतर सदरची बैठक संपन्न झाली.

Previous Post

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

Next Post

ज्ञानेश्वरी माउलींची अमृतवाणी गर्जणार ७५० भक्तांच्या मुखातून

Related Posts

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
इतर घडामोडी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
Next Post
ज्ञानेश्वरी माउलींची अमृतवाणी गर्जणार ७५० भक्तांच्या मुखातून

ज्ञानेश्वरी माउलींची अमृतवाणी गर्जणार ७५० भक्तांच्या मुखातून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026