सोलापूर – बुद्ध पौर्णिमेनिमित्त दिनांक १६ मे रोजी पार्क चौक स्टेडियम शोरूम येथे विल्स रोलर स्केटिंग क्लबच्यावतीने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि. १६ मे रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत पार पडली. या स्पर्धेचे उद्रघाटन सोलापूर जिल्हा सायकलिंग व रोल बॉल स्केटिंग असोसिएशनचे सचिव दिपक घंटे यांच्या हस्ते, व्हील्स रोलर स्केटिंग क्लब २ चे मुख्य प्रशिक्षक अनमोल चांदणे व आदी जणांच्या उपस्थितीत स्पर्धा फित कापून करण्यात आली.
यामध्ये एकूण १५० स्पर्धकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला. व्हील्स रोलर स्केटिंग क्लब -१, विनर फाउंडेशन स्केटिंग क्लब, रेनबो स्केटिंग क्लबच्या स्पर्धकांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदीविलेला होता. यामध्ये बिगीनर, ०-६, ६-८, ८-१०, १०-१२, १२-१४, १४-१६ व खुला गटाच्या स्कोड मुले, मुलींच्या या वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
यास्पर्धेमध्ये व्हील रोलर स्केटिंग क्लब २ चे घवघवीत यश मिळविले असून मुख्य प्रशिक्षण अनमोल चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला क्रमांक १० ते १२ वयोगटातील राजवीर भालेराव, ० ते ६ वयोगटातील दुसरा क्रमांक जुई जगताप, १२ ते १४ वयोगटातील, दुसरा क्रमांक आर्षभ चौरेसिया याने पटकाविला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुनीता रोटे यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर सायकलिंग असोसिएशन व रोल बॉल असोसिएशनचे सचिव दीपक घंटे, व्हील रोलर स्केटिंग क्लब २ चे मुख्य प्रशिक्षण अनमोल साहेबराव चांदणे, सम्यक मोहोळकर, वासुदेव क्यारमकोंनडा, सागर राठोड, दीपक भैय्या, समीर यादवाड, सोनाली घंटे आदी उपस्थित होते.