येस न्युज नेटवर्क : अभिनेत्री केतकी चितळेला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. सोलापूर येथील सदाभाऊ खोत यांच्या दालनात घुसून राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले. दरम्यान, आपण केतकी चितळेच्या पोस्टचे समर्थन केले नसल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. सदाभाऊ खोत सध्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तिच्याविरोधात ठिकठिकाणी पोलीस तक्रार दाखल केली. काही ठिकाणी पोलिसांनी गुन्हेदेखील दाखल केले आहेत.