पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या यांची बैठक संपल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांच्या गटातील नगरसेवकांची बैठक घेतली.
या बैठकीत महापौर पदासाठी डॉक्टर किरण देशमुख यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती नगरसेवकांनी दिली आहे.
या बैठकीची माहिती बाहेर आल्यानंतर आमदार देशमुख यांच्या गटातील नगरसेवकांनी स्वतंत्र बैठक झाली नसल्याचे सांगत नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार कार्यक्रम झाल्याचे सांगत सारवासारव केली.मात्र, या स्वतंत्र बैठकीमुळे भाजपात वेगळी चूल तर मांडली जाणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

